WhatsInYourDabba challenge viral in Bollywood industry  
मनोरंजन

#WhatsInYourDabba बॉलिवूडकर विचारताहेत, 'तुमच्या डब्यात काय?'

सकाळ डिजिटल टीम

सध्या बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातले सेलिब्रिटी एकमेकांना वेगवेगळे चॅलेंज देताना दिसतात. कधी फिटनेस चॅलेंज तर कधी बॉटल कप चॅलेंज... आता सर्व बॉलिवूडची मंडळी पुन्हा एक नवीन चॅलेंज एकमेकांना देताना दिसताहेत. हा भन्नाट हॅशटॅग आणि चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कोणतंय हे चॅलेंज, बघू!

सध्या हे बॉलिवूडकर एकमेकांना #WhatsInYourDabba असा चॅलेंज देत आहेत. हेल्दी फूडसाठी सुरू केलेलं हे चॅलेंज आता व्हायरल होतंय. #WhatsInYourDabba या हॅशटॅगने हव्या त्या व्यक्तीला मेन्शन करत तुमचं आवडतं हेल्दी फूड कोणतं, असा सवाल केला जातोय. ज्याला चॅलेंज दिलंय त्याने ते स्विकारत आपल्या आवडणाऱ्या हेल्दी फूडसोबत फोटो पोस्ट करायचा, आणि हे खाणं का आवडतं, त्याचा फायदा काय हे सांगायचं. मग पुन्हा #WhatsInYourDabba हा हॅशटॅग देत इतर लोकांना टॅग करायचं. 

बॉलिवूडमध्ये सध्या ट्विंकल खन्नाने हा ट्रेंड सुरू केलाय. तिने बिटरूट टिक्कीचा फोटो शेअर करत त्याचं महत्त्व सांगितलंय. मग तिने अक्षय कुमार, मलायका अरोरा, सोनाली बेंद्रेला यांना चॅलेंज दिलंय. या सर्वांनी हे चॅलेंज पूर्ण केलंय. तसेच शिखर धवननेही #WhatsInYourDabba हे चॅलेंज स्विकारत आपलं हेल्दी फूड शेअर केलंय.

सोनाली बेंद्रेने साबुदाणा खिचडी पण साबुदाणा न घालता फक्त बटाट्यांची तयार केलेली खिचडी शेअर केलीय. तर अभय कुमारने ऑव्होकॅडो ऑन टोस्ट आणि चिया पुडिंग शेअर केलंय.

मलायका आरोराने झुचिनी नूडल्स विथ रेड पेपरसोबत फोटो शेअर केलाय.

क्रिकेटपटू शिखर धवनने उत्तपा सांबार आणि फळांचा फोटो शेअर केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT