When Divya Bharti’s mother blamed Aamir Khan,Read detail story Google
मनोरंजन

Divya Bharti च्या आईने आमिर खानवर केलेला आरोप;म्हणालेल्या,'त्याच्यामुळेच..'

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीनं १९९३ साली आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला होता.

प्रणाली मोरे

दिव्या भारती(Divya Bharti) म्हणजे ९० सालातील एक आरसपानी सौंदर्यवती. आपल्या दिसण्यासोबतच आपल्या पडद्यावरच्या मनमोकळ्य़ा,उत्स्फुर्त वावरानं तिनं सर्व प्रेक्षकांची मनं अगदी काही वर्षातच जिंकली. तेव्हाच्या प्रत्येक नव्या सिनेमासाठी दिग्दर्शक-निर्माते दिव्यालाच पहिली पसंती द्यायचे. दिव्या भारतीनं तेलुगु सिनेमातून वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण केलं. त्यानंतर काही साऊथचे सिनेमे केल्यानंतर तिनं आपला मोर्चा हिंदी सिनेमांकडे वळवला. १९९२ मध्ये तिनं विश्वात्मा सिनेमातून बॉलीवूडमध्ये मोठ्या दणक्यात एन्ट्री केली. दिव्यानं त्या काळातल्या अनेक बड्या हिरोंसोबत काम केलं. पण कदाचित अनेकांना हे माहित नसेल की डर सिनेमासाठी शाहरुख-जुही ऐवजी दिग्दर्शक-निर्मात्यांची पसंती आमिर(Aamir Khan)-दिव्याच्या जोडीला होती. पण नंतर अचानक काहीतरी घडलं आणि आमिर व दिव्या दोघंही डर सिनेमातून बाहेर पडले.(When Divya Bharti’s mother blamed Aamir Khan,Read detail story)

१९९३ मध्ये डर सिनेमात सनी देओल सोबत दिव्या भारतीला कास्ट केलं होतं. दिव्याच किरण ही भूमिका साकारणार होती. पण त्यावेळी समोर आलेल्या काही वृत्ता नुसार दिव्याला त्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दिव्याचे निर्माते-दिग्दर्शकांसोबत काही वैचारिक मतभेद झाल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं. पण तेव्हा काही दिवसांनी दिव्या भारतीच्या आईनं मोठा खुलासा केला होता की,आमिर खानमुळे दिव्याच्या जागी जुही चावलाला डर सिनेमात घेण्यात आलं. तिची आई म्हणाली होती, जेव्हा सनी देओलला सिनेमासाठी साईन केलं गेलं, तेव्हा तो दिव्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक होता. पण आमिरला दिव्याच्या जागी जुही हवी होती.

त्यावेळी दिव्या एका शो साठी अमेरिकेत गेली होती. त्यावेळी डरची स्टारकास्ट सनी,दिव्या आणि आमिर असेल अशी रितसर घोषणाही झाली होती. पण जेव्हा दिव्या मुंबईत परत आली तेव्हा अचानक तिला कळलं की तिच्या जागी जुहीला सिनेमात घेण्यात आलं आहे. तेव्हा दिव्याच्या आईनं आमिरवर आरोप केला होता की त्यानेच जुहीचं नाव पुढे केलं आणि दिव्याला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखविला. पण नंतर जेव्हा जुहीची एन्ट्री सिनेमात झाली त्यानंतर आमिरही सिनेमातून स्वतःहून बाहेर पडला आणि त्याच्याजागी शाहरुखला घेण्यात आलं.

त्यानंतर १९९२ मध्ये जेव्हा आमिरनं लंडनमध्ये दिव्यासोबत लाइव्ह परफॉर्मन्स करण्यास नकार दिला होता तेव्हा दिव्यानं मुद्दामहून एका मुलाखतीत तो विषय बोलून दाखवला होता. ती म्हणाली होती, आमिर आणि माझ्यात काहीच बिनसलेलं नाही. लाइव्ह शो दरम्यान माझ्याकडून एक चूक झाली, पण ती फार कोणाच्या लक्षात आली नाही. पण आमिरनं त्यानंतर लाइव्ह शो मध्ये दिव्या बरोबर परफॉर्म करणं टाळलं, अनेकदा जुहीला पसंती दिली. अनेकदा तर दिव्या बरोबर परफॉर्म करण्याची वेळ आली तेव्हा आयत्यावेळेस तो थकल्याचं कारण पुढे करायचा. एका वेळी असं घडलं असताना अचानक मग आमिर ऐवजी सलमाननं दिव्यासोबत परफॉर्म केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT