Priyanka Chopra, Abhishek Bachchan Google
मनोरंजन

प्रियंकाच्या 'त्या' हरकतीनं अभिषेकवर आली होती तोंडावर पडण्याची वेळ

सिमि गरेवाल यांच्या बहुचर्चित शो चा व्हिडीओ व्हायरल झाला अन् झाला मोठा खुलासा.

प्रणाली मोरे

सिमी गरेवाल (Simi Garewal) यांनी त्यांच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी मुलाखतींच्या चॅट शो मधील त्यांच्या आवडत्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ती मुलाखत आहे प्रियंका चोप्राची(Priyanka Chopra),तेव्हा प्रियंका अगदीच लहान होती. त्या व्हिडीओची सुरुवात होते ती सिमी गरेवाल यांच्या प्रश्नाने. त्या प्रियंकाला विचारत आहेत,''तुझं अभिषेकसोबत कसं ट्युनिंग आहे?'' आता त्यावेळी प्रियंका अभिषेक सोबत केलेल्या एका सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं शो मध्ये गेली होती. त्यावेळी त्या प्रश्नाला उत्तर देताना प्रियंका म्हणाली,''एकदम मॅड''.

सिमी गरेवाल प्रियंकाला सिनेमाच्या शूटिंग दरम्यानं घडलेल्या एका प्रसंगाविषयी प्रश्न विचारतात. ''तू अभिषेकचा मोबाईल चोरला होतास का?'' प्रियंका त्यावर जोरदार हसली आणि म्हणाली,''त्याने सुरुवातीला माझा चोरला होता. तो बसला होता माझ्या फोनवर. खरंतर तो त्याच्या व्हॅनिटीमध्येही इतका वेळ बसत नाही तेवढा वेळ केवळ मला त्रास देण्यासाठी माझ्या फोनवर बसला होता. नंतर मी पण ठरवलं त्याचा फोन चोरायचा. एकदा त्यानं असाच फोन व्हॅनिटीत ठेवला होता आणि स्वतः कुठेतरी निघून गेला होता. मी लगेच त्याचा फोन घेतला आणि लपवला''. पण तेव्हा लगेच सिमी गरेवाल म्हणाल्या,''तू यातलं काहीतरी लपवतेयस''. तेव्हा प्रियंकानं ते मान्य करत सांगितलं,''हो,मी राणी मुखर्जीला अभिषेकच्या फोनवरुन मेसेज केला की,'I Miss You'.'' आणि ती खो-खो हसायला लागली. आता तिच्या या हसण्यात बरंच काही दडलं आहे. कारण त्याचवेळी राणी-अभिषेकच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या.

तेव्हा राणीचा त्या मेसेजवर जो रीप्लाय आला होता तोही प्रियंकानं सांगितला. तेव्हा राणी म्हणाली होती,''Hi AB, What is Wrong with you?'' त्या व्हिडीओच्या शेवटी प्रियंकानं मात्र सिमि गरेवाल यांना विचारलंच की त्यांना या प्रसंगाविषय़ी कोणी सांगितली होतं. तेव्हा सिमी नाव नं घेता म्हणाल्या,''मी खूप लोकांना ओळखते, गोष्टी बरोबर कळतात''. प्रियंका मात्र म्हणाली,''मला माहिती आहे,अभिषेकनेच सांगितलं असेल''. या सिमि गरेवाल यांच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया मात्र फनीआहेत. सिमि गरेवाल आणि प्रियंका दोघींचं चाहत्यांनी त्यांच्या सौंदर्यावरनं भरभरुन कौतूक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सीजनबाबत प्रेक्षक झाले व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या रणधुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT