When Samantha Ruth Prabhu said she doesn't like Hrithik Roshan's looks too much Google
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: हृतिक विषयी समंथाचं मोठं वक्तव्य, म्हणाली,'त्याचे चाहते मला मारतील पण...'

समंथाचा जवळपास दहा वर्षापूर्वीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामुळे हृतिकचे चाहते अभिनेत्रीवर नाराज होण्याची चिन्ह दिसत आहेत.

प्रणाली मोरे

समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) दक्षिणेसोबतच हिंदी सिने-रसिकांमध्ये देखील प्रसिद्ध आहे. 'द फॅमिली मॅन' वेब सिरीजमध्ये तिला 'राजी'च्या भूमिकेत खूप पसंत केलं गेलं. त्यानंतर पुष्पा सिनेमातील 'ऊ अंटवावा' गाण्यानंतर तर हिंदी रसिकांमध्ये तिची क्रेझ वाढलेलीच दिसली.

नुकतीच ती करणच्या 'कॉफी विथ करण ७' या शो मध्ये देखील येऊन गेली. समंथानं साऊथमध्ये करिअरची १२ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यादरम्यान आता एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाला आहे ,ज्यात ती बोलताना दिसत आहे की तिला हृतिक रोशनचा(Hrithik roshan) लूक आवडत नाही.

हा व्हिडीओ खूप जुना आहे,ज्यामध्ये समंथाला ओळखणं देखील कठीण जातंय.(When Samantha Ruth Prabhu said she doesn't like Hrithik Roshan's looks too much)

समंथाच्या आता बॉलीवूड पदार्पणाची चर्चा रंगली असताना त्या दरम्याना तिचा हा जुना व्हिडीओ चर्चेत आल्याने गोष्टी वेगळं वळण घेऊ शकतात. समंथानं हे वक्तव्य तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत केलं होतं, ज्यात तिनं हृतिकवर कमेंट केली होती.

समंथानं आपल्या करिअरची सुरवात २०१० मध्ये तेलुगु सिनेमातून केली होती. त्या सिनेमात तिच्यासोबत पूर्वाश्रमीचा पती नागाचैतन्य देखील झळकला होता. त्या सिनेमानं त्या वर्षात खूप चांगली कमाई केली होती,तर अनेक पुरस्कारही पटकावले होते.

रेडिटने समंथाची २०१० मधील साक्षी टी.व्हीला दिलेल्या मुलाखतीची एक क्लीप समोर आणली आहे. व्हिडीओत समंथा ओळखू येत नाही.

तिचा आताचा लूक तेव्हापेक्षा खूपच बदललेला आहे. मुलाखतीमध्ये समंथा आपलं हसू रोखत म्हणताना दिसत आहे की,''मला हृतिक रोशनचा लूक आवडत नाही. कदाचित माझी ही कमेंट ऐकल्यावर लोकं मला चांगलाच मार देतील''.

हृतिक रोशनचा फॅन फॉलॉइंग जबरदस्त आहे. त्याच्या लूक्सवर अनेकजण फिदा आहेत. त्याला ग्रीक गॉडचा दर्जा लोकांनी दिला आहे. समंथाचा हा व्हिडीओ हृतिकच्या चाहत्यांना खटकेलही.

रेडिटवर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'समंथा खूप वेगळी व्यक्ती आहे'. एकानं समंथाला सहमती दर्शवत म्हटलं आहे,''समंथा तू अगदी बरोबर आहेस. खूप जणं ग्रीक दिसणाऱ्या हृतिकच्या तुलनेत भारतीय दिसणाऱ्या प्रभास,राणा आणि रामचरणला पसंत करतात''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : नक्की कोण जिंकलं? कोण हरलं? भारत-पाक सामन्यावरून राज ठाकरेंचे फटकारे, नवं व्यंगचित्र केलं शेअर....

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : अजित पवारांच्या ताफ्यासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, बीडमधील प्रकार

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT