salman saroj khan 
मनोरंजन

जेव्हा सलमान खानने केला होता सरोज खान यांचा अपमान..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी दुःखी आहे. केवळ कलाकारच नाही तर चाहतेही त्यांच्या आठवणीत दुःखी आहेत. सोशल मिडियावर अनेकजण त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत आहेत. मात्र काही काळ सरोज खान या कामामुळे थोड्या हैराण होत्या. 

सरोज खान या काम मिळत नसल्याने अडचणीत आहेत असं कळाल्यावर सलमान खानने सरोज खान यांची भेट घेतली होती. एवढंच नाही तर त्याने त्याच्या आगामी सिनेमात काम देण्याचं देखील कबुल केलं होतं. सलमान खान आणि सरोज खान यांनी बीवी हो तो ऐसी, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक सिनेमात एकत्र काम केलं. 

याबद्दल माहिती देताना सरोज खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा सलमानने मला विचारलं की सध्या मी काय करतेय? मी त्याला प्रामाणिकपणे सांगितलं की माझ्याकडे काही काम नाहीये आणि मी नवीन अभिनेत्रींना भारतीय शास्त्रीय नृत्य शिकवत आहे. हे ऐकताच त्याने मला म्हटलं होतं की आतापासून तुम्ही माझ्यासोबत काम कराल. मला माहित होतं की सलमान खान त्याच्या शब्दाचा पक्का आहे आणि तो त्याचं वचन पूर्ण करणार. 

मात्र २०१६ मध्ये सरोज खान यांनी सलमान खानवर त्यांना दुर्लक्षित केल्याचा आरोप केला होता. सरोज खान यांनी सांगितलं होतं की, एकदा एका पेशंटला सलमान खानसोबत बोलायचं होतं. तेव्हा त्यांनी त्यांच्या एका मित्राला सलमान खानला फोन करायला सांगितलं आणि सांगितलं की मास्टरजींना बोलायचं आहे असं सांगा. मात्र सलमानने त्यांचा फोन घेण्यास नकार दिला.

सरोज यांनी तेव्हा म्हटलं होतं की हा खूपंच उद्धटपणा आहे. सलमान मला ओळखतो आणि कित्येक सिनेमांमध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं तेव्हा त्याची अशी वागणूक माझ्यासाठी अपमानास्पद आहे.     

when saroj khan felt salman khan insulted her but after that promised her to give work in film  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT