Tiger Shroff Google
मनोरंजन

शाळेतल्या शिक्षिकेला चावला म्हणून 'टायगर' नाव पडलं; खरं नाव वेगळच...

टायगर श्रॉफच्या वाढदिवसा निमित्तानं जाणून घ्या त्याच्या नावाची कहाणी

प्रणाली मोरे

टायगर श्रॉफनं(Tiger Shroff) ३ मार्चला वयाची ३१ वर्ष पूर्ण केलीयत. आज त्याच्या आयुष्यातील खास सेलिब्रेशनचा दिवस आहे. टायगर हा सिनेमातील त्याच्या अॅक्शन्स आणि डान्स स्कीलमुळे अधिक ओळखला जातो. बॉलीवूड(Bollywood)चे प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ(Jackie Shroff) आणि आयेशा श्रॉफ यांचा तो मुलगा आहे. त्याचा जन्म २ मार्च,१९९० सालचा. आज आपण त्याच्या जन्मासोबतच जाणून घेणार आहोत त्याच्या नावाची जन्मकहाणी. त्याचं 'टायगर' हे नाव कसं पडलं याविषयी. टायगरच्या जन्मावेळी त्याच्या पालकांनी त्याचं नाव 'जय हेमंत' असं ठेवलं होतं. पण मग बॉलीवूडमध्ये आल्यावर त्याचं 'टायगर' नाव कसं लागलं बरं. एकदा टायगरनेच एका मुलाखतीत आपल्या नावाची कहाणी सांगितली होती. काय म्हणाला होता टायगर?

त्यानं त्या मुलाखतीत सांगितलं होतं,''मी लहान असताना शाळेतील मुलांना चावायचो. आणि माझी ती सवय बनून गेली होती. काहीही झालं की बचावाचा पर्याय म्हणून मी पलटवार करताना मारायचो नाही तर चावायचो. तेव्हा लोकं माझा त्यावेळचा आवेग पाहून माझी तुलना रीअल 'टायगर' शी करायला लागले. टायगर पुढे आपल्या मुलाखतीत म्हणाला होता,''मी माझ्या शाळेतील एका शिक्षिकेला देखील चावलो होतो. त्यानंतर मला शिक्षा झाली होती''. त्यानं पुढे असे देखील त्या मुलाखतीत सांगितले होते की, ''मला माझं नाव नेहमी मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतं. त्यानं नागपुर मधील प्राणीसंग्रहालयात 'ली' नावाची एक वाघिण दत्तक घेतली आहे. तिच्या संगोपनासाठीचा खर्च २०१४ पासून टायगर स्वतः करत आहे. 'हिरोपंती' या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं त्यानं तिथं पहिल्यांदा भेट दिली होती. त्यानं त्यावेळी सांगितलं होतं की,'' तुमच्याकडे जेव्हा एखादी गोष्ट करण्यासाठी ताकद असते,तेव्हा तुमची जबाबदारी अधिक वाढते,म्हणूनच 'ली' ला दत्तक घेण्याचा मी निर्णय घेतला आहे''. अशी पोस्ट त्यानं त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती.

टायगरला अभिनयात नाही तर खेळात आपलं करिअर करायचं होतं असंही त्यानं तेव्हा सांगितलं होतं. ''वडिल जॅकी श्रॉफ यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी अनेकांनी तेव्हा मार्गदर्शन केलं पण माझं स्वप्न होतं फुटबॉल मध्ये करिअर करायचं. पण शेवटी मी अभिनेता झालो,अपघातानं''. टायगरने २०१४ मध्ये 'हिरोपंती' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता लवकरच त्याचा 'हिरोपंती २' देखील आपल्या भेटीस येत आहे. तारा सुतारिया या सिनेमात त्याच्यासोबत दिसणार आहे. २९ एप्रिलला टायगर श्रॉफचा हा सिनेमा आपल्या भेटीस येणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adulteration: फळ-भाज्यांतील भेसळीवर महाराष्ट्र सरकारचा मोठा प्रहार! दोषींना थेट परवाना रद्द करण्याचा इशारा, सरकार अॅक्शन मोडमध्ये

Ashok Kharat Case: SITकडून कसून चौकशी, रूपाली चाकणकर बघा काय म्हणाल्या?

SSC Success Story : चाळीशीनंतर पुन्हा धरली शाळेची वाट! ८१ महिलांनी घडवला इतिहास, जावळीच्या महिलांची प्रेरणादायी यशोगाथा..

Latest Marathi News Live Update: विकास लवांडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी वाघोलीत वारकरी संप्रदायाचे आंदोलन

कुर्रर्र! सूर्यकुमार यादवच्या लेकीचं नाव समजलं का? बापमाणसाने ठेवलं भारी नाव... जाणून घ्या अर्थ...

SCROLL FOR NEXT