नागराज के 'झुंड' ने हमे 'फुटबॉल' जैसे उडाया; आमिरची थेट प्रतिक्रिया

नागराज मंजुळेचा बहुचर्चित 'झुंड' ४ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
Aamir Khan, Nagraj Manjule
Aamir Khan, Nagraj ManjuleGoogle

नागराज मंजुळे(Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन(AMitabh Bachchan) अभिनित 'झुंड'(Jhund) हा सिनेमा ४ मार्च,२०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. नागराज नेहमीचं त्याच्या सिनेमातील कथानकांमुळे चर्चेत राहिला आहे. त्याची पहिली 'पिस्तुल्या' ही शॉर्ट फिल्म ते आताचा 'झुंड' असे सगळेच दरम्यानचे सिनेमे पाहिले की हे लक्षात येईलच. त्याचा सिनेमा म्हणजे समाजातील घटनांचं,घटकांचं अचूक टिपलेलं चित्रण जे थेट हृदयाला भिडतं,तुम्हाला त्याच्या कथानकाशी जोडण्यास मजबूर करतं. 'झुंड' या सिनेमातनंही नागराजनं आपल्यातलं ते 'विशेष' दाखवून दिलं आहे. या सिनेमाकडून सर्वांच्याच खूप अपेक्षा आहेत. आणि अर्थातच नागराजची बॉलीवूड जर्नी सुसाट पळणार हे देखील ठरलेलं.

नुकतंच या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आमिर खान(Aamir Khan)साठी ठेवण्यात आलं होतं. हा सिनेमा पाहिल्यानंतर आमिर खाननं नोंदवलेली प्रतिक्रिया सर्वात लक्षवेधी ठरत आहे. सिनेमा पाहिल्यानंतर आमिरनं नागराज,अमिताभ बच्चन यांच्यासोबतच कौतूक केलं आहे ते सिनेमातील लहान मुलांचं. तो थेट म्हणाला आहे,''सिनेविश्वात मी जे ३०-३५ वर्ष काम केलंय त्याला नागराच्या 'झुंड' ने थेट फुटबॉलसारखं उडवून दिलंय''. आमिर नेमंक काय म्हणालाय हे त्याच्याकडूनच ऐकण्यासाठी इथं बातमीत लिंक जोडली आहे ती अवश्य ऐका.

Aamir Khan, Nagraj Manjule
मध्यरात्री 'ब्रह्मास्त्र'च्या टीमची तातडीची मीटिंग! कारण ऐकाल तर...

'झुंड' सिनेमाची निर्मिती टी-सीरिजची,नागराज मंजुळे,तांडव फिल्म एंटरटेन्मेंट यांची आहे. आता पहायचं 'झुंड' मध्ये रंगविला गेलेला स्पोर्ट्स ड्रामा आणि अमिताभ यांनी साकारलेली विजय बारसे ही स्पोर्ट्स प्रशिक्षकाची भूमिका प्रेक्षक किती डोक्यावर उचलून धरत आहेत. अर्थात नागराजचा सिनेमा म्हणजे अपेक्षा वाढल्यात हे नक्की. त्यात आमिरनं प्रशंसा केलीय म्हटल्यावर सिनेमागृहात 'झुंड' पहायला गेलंच पाहिजे,नाही का!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com