Who is Leena Manimekalai and why #ArrestLeenaManimekal is trending on Twitter?
Who is Leena Manimekalai and why #ArrestLeenaManimekal is trending on Twitter? Google
मनोरंजन

KAALI Controversy: कोण आहे लीना मणिमेकलई?तिला अटक करण्याची का होतेय मागणी?

प्रणाली मोरे

लीना मणिमेकलाई(Leena Manimekalai)चा जन्म तामिळनाडूतील मदुराईमधला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासोबतच ती चांगल्या कविता देखील लिहिते,अभिनयातही पारंगत आहे. तिनं जास्त डॉक्युमेंट्री फिल्म्स बनवल्या आहेत. तिच्या डॉक्युमेंट्रीना बऱ्याच परदेशी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलं आहे. लीनाने काही दिवसांसाठी मेनस्ट्रीम सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भूमिका पार पाडलेली आहे. यानंतर तिची पहिली डॉक्युमेंट्री 'महात्मा' प्रदर्शित झाली होती. त्यानंतर लीनाने दलित,महिला,ग्रामीण आणि LBGTQ समाजाच्या समस्यांवर शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्यूमेंट्री बनवल्या. लीना स्वतःला बाय-सेक्शुअल असल्याचं सांगते. अभिनेत्री म्हणून लीनाने ४ शॉर्ट फिल्म 'चेलम्मा', 'लव्ह लॉस्ट', 'द व्हाइट कॅट' आणि 'सेनगडल द डेड सी' मध्ये काम केलं आहे.(Who is Leena Manimekalai and why #ArrestLeenaManimekal is trending on Twitter?)

लीनाने गेल्या शनिवारी म्हणजे २ जूलै,२०२२ रोजी आपली शॉर्ट फिल्म 'काली' (KAALI) चे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं,ज्यानंतर वादाची ठिणगी पडली. धार्मिक वादाचे सूर उमटू लागले. 'काली' सिनेमाच्या पोस्टरवर काली मातेच्या पेहरावातील महिला धुम्रपान करत आहे असं दाखविले गेले आहे. दिल्लीतील गौ महासभेचे अध्यक्ष अजय गौतम यांनी दिल्ली पोलिसांकडे लीना विरोधात तक्रार दाखल करत केंद्रीय गृहमंत्रालयावर 'काली' सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. यावर लीनाने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

'काली' च्या पोस्टरवरुन निर्माण झालेल्या वादावर(Controversy) ट्वीट करताना लीनाने लिहिलं होतं की,''मी कोणालाही घाबरत नाही. माझ्याजवळ गमावण्याठी काहीच नाही. जे अन्यायविरोधात आवाज उठवण्याची धमक स्वतःमध्ये ठेवून आहेत त्यांच्या बाजूने मी नेहमीच आवाज उठवणार. आणि याची किंमत मला माझे प्राण देऊन चुकवावी लागत असेल तर माझी काहीच हरकत नाही''. तिचं म्हणणं आहे की हा सिनेमा टोरंटो मधील 'आगा खान म्युझियम'मध्ये झालेल्या 'रिदम ऑफ कॅनडा' या कार्यक्रमाचा एक भाग होता.

'काली' सिनेमाच्या पोस्टरवरुन वाद निर्माण होताच,लोकांनी फटकारताच लीनाने सोशल मीडियावर आपलं अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे आणि कमेंट बॉक्सला रिस्ट्रिक्ट केलं आहे. म्हणजेच तुम्ही आता तिच्या पोस्टवर कमेंट करू शकत नाही. लीनाने सोशल मीडियावर स्पष्टिकरण देताना म्हटलं आहे की,''हा सिनेमा एक अशा घटनेची कहाणी आहे ज्यामध्ये काली प्रकट होते आणि टोरंटोच्या रस्त्यावर फिरू लागते. जर तुम्ही संपूर्ण सिनेमा पहाल तर मला अटक करा असे हॅशटॅग नाही तर माझ्यावर प्रेमाचा,कौतुकाचा वर्षाव करणारे हॅशटॅग ट्वीटरवर शेअर कराल''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT