Aryan khan selfie 
मनोरंजन

Drugs case: आर्यन खानच्या सेल्फीमधील 'तो' मिस्ट्री मॅन कोण?

आर्यनच्या अटकेच्या काही तास आधी त्याच्यासोबत एका व्यक्तीने सेल्फी काढला होता.

सकाळ डिजिटल टीम

Aryan Khan Arrested: प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली. आर्यनच्या अटकेच्या काही तास आधी त्याच्यासोबत एका व्यक्तीने सेल्फी काढला होता. हा सेल्फी नंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. सेल्फीमधील व्यक्ती हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा NCB अधिकारी असल्याची शंका होती. परंतु तो मिस्ट्री मॅन कोण आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. "फोटोमधील व्यक्ती एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नसून, तो सेल्फी आर्यन खानला अटक होण्यापूर्वीचा आहे", असं एनसीबीने रविवारी स्पष्ट केलं. आर्यनचा तो सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला.

रविवारी, आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट आणि फॅशन डिझायनर मुनमुन धामेचा यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी तिघांना सोमवारपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. तर नुपूर सतिजा, इश्मीतसिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर ही इतर आरोपींची नावं आहेत. ॲड. सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खानच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला. एनसीबीने पाच ऑक्टोबरपर्यंत या तिघांच्या एनसीबी कोठडीची मागणी केली होती. त्यावर हा जामीनपात्र गुन्हा असून, तिघांकडे प्रतिबंधित पदार्थ सापडले नसल्याचा युक्तिवाद ॲड. मानशिंदे यांनी केला.

क्रूझ सफारीवर रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रूझ सफारीच्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता. नेमकी त्याची दखल एनसीबीच्या पथकाने घेतली आणि कारवाईचे सत्र सुरू झाले. मुंबई ते गोवा या तीन दिवसांच्या क्रूझ सफारीवर श्रीमंत घरची मुले सहभागी असल्याने अमली पदार्थ आणि रेव्ह पार्टीचे आयोजन असल्याचा संशय एनसीबीला आला. एनसीबीने सापळा रचून या क्रूझवर प्रवेश केला. पार्टी सुरू होताच दबा धरून बसलेले एनसीबी अधिकाऱ्यांनी अचानक छापे घालत कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त केले व क्रूझवरील तरुणांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT