Shah Rukh Khan Google
मनोरंजन

Shah Rukh Khan ने नेमल्यात महिला बॉडीगार्ड्स ..यामागचं कारण ऐकाल तर म्हणाल,'हे फक्त किंग खानच करू शकतो'

शाहरुखनं आपल्या सुरक्षेसाठी महिला बॉडीगार्ड्स का नेमल्यात यामागच्या कारणाचा खुलासा नुकत्याच एका मुलाखतीत केला होता.

प्रणाली मोरे

Shah Rukh Khan: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचे जगभरात करोडो चाहते आहेत आणि त्यात जास्तकरून त्याच्या फिमेल फॅन्सचा अधिक भरणा आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि 'कुछ कुछ होता है' सारख्या सिनेमांतून एका आदर्श प्रेमीची भूमिका करणाऱ्या शाहरुख खानवर अनेक मुली आजही जीव ओवाळून टाकतात.

अनेकदा शाहरुख जेव्हा पब्लिकमध्ये जातो तेव्हा त्याच्या चाहत्यांना त्याला स्पर्श करायचा असतो..त्याला मिठी मारायची असते..त्याच्यासोबत फोटो काढायचे असतात.

हेच कारण आहे की शाहरुखनं स्वतःसाठी फीमेल बॉडीगार्ड्स ठेवल्या आहेत. (Why Shah rukh khan hired female bodyguards? answer will melt your hearts )

शाहरुख खानच्या या फीमेल बॉडीगार्ड्स त्याचं त्याच्या फीमेल फॅन्सपासून संरक्षण करतात. शाहरुख महिलांसोबत आपल्या चांगल्या वागणुकीसाठी ओळखला जातो. 'ही इज ए ट्रुली जेंटेलमन..'

त्याला वाटतं की त्याच्या फीमेल फॅन्सना त्याच्या मेल बॉडीगार्ड्स कडून उद्धटपणाची वागणूक मिळू नये.

एका कार्यक्रमा दरम्यान शाहरुखनं स्वतः म्हटलं होतं की त्याला खूप वाईट वाटतं जेव्हा गर्दीमध्ये त्याचे मेल बॉडीगार्ड्स त्याच्या फीमेल फॅन्सना त्याच्यापासून लांब करण्यासाठी धक्का देतात.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

शाहरुख खान म्हणाला,''जर तुम्ही बाहेर जात आहात तर तुमच्या सुगंधानं लोकांना तुमच्याजवळ यावसं वाटलं पाहिजे. त्यामुळे आपले दातही ब्रश करा बाहेर जाताना. हे सीक्रेट फक्त फॉलो करा''.

'' जेव्हा मी देखील कोणत्या पार्टीला जातो..तेव्हा तिथे मुलींना माझ्याजवळ यायचं असतं माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी. पण त्या ज्या पद्धतीनं अंगावर येतात ते अनेकदा घाबरवणारं असतं''.

''त्यामुळे मी लेडी बॉडीगार्ड्स ठेवल्यात. मला प्रोटेक्ट करण्याच्या नादात जेव्हा माझे मेल बॉडीगार्ड्स मुलींना माझ्यापासून लांब करताना धक्का द्यायचे ते खूप उद्धटपणाचं वाटायचं मला''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT