Will Kartik Aaryan And Rashmika in Aashiqui3? Instagram
मनोरंजन

'आशिकी ३' मध्ये कार्तिकसोबत दिसणार का रश्मिका मंदाना? जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून 'आशिकी ३' मध्ये कार्तिकची लीडिंग लेडी कोण म्हणून अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत होती.

प्रणाली मोरे

Aashiqui 3: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) सध्या बॉलीवूडमध्ये आपले पाय भक्कम रोवण्यासाठी मेहनत घेतेय. सध्या तिच्याकडे बॉलीवूडचे काही चांगले प्रोजेक्ट आहेत. त्यापैकी एक 'गूडबाय' आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच ती स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला पण आता ऱश्मिका संदर्भात आणखी एक बातमी समोर येत आहे. बोललं जात आहे की कार्तिक आर्यनसोबत ती 'आशिकी ३' मध्ये दिसणार आहे.(Will Kartik Aaryan And Rashmika in Aashiqui3?)

असंही बोललं जात आहे की 'आशिकी ३' च्या निर्मात्यांनी अद्याप कोणत्याच अभिनेत्रीला सिनेमासाठी फायनल केलेलं नाही आणि यासंदर्भात मीडियाला देखील स्पष्टीकरण करणारं निवेदन पाठवण्यात आलं होतं. पण एका वेबसाईटला मिळालेल्या ताज्या वृ्तानुसार,सूत्रांकडून कळलं आहे की श्रद्धा कपूर,दीपिका पदूकोण आणि रश्मिका मंदाना या तिघींची नाव कार्तिकआर्यनसोबत प्रमुख भूमिका करण्यासाठी चर्चेत आहेत. या म्युझिकल सिनेमाचं शूटिंग या वर्षाच्या शेवटी सुरु होणार आहे.

असंही बोललं जातंय की 'आशिकी ३' साठी दीपका पदूकोणचं नाव कार्तिक आर्यन सिनेमाशी जोडण्या अगोदरपासून चर्चेत होतं. पण याविषयी अधिकृतरित्या काही बोललं गेलेलं नाही. श्रद्धा कपूर याआधी 'आशिकी २' मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसली होती. त्यामुळे तिला पुन्हा या सिनेमाशी जोडलं जाणं आवडेल की नाही हे पाहणं इंट्रेस्टिंग असेल. तर बोललं जात आहे की कृती सनन देखील या रांगेत आहे. पण अद्याप त्यावर स्पष्ट काही बोललं गेलेलं नाही.

तुमच्या माहितीसाठी इथे सांगतो की,रश्मिका आणि कार्तिकनं काही दिवसांपूर्वीच एका चॉकलेटच्या ब्रॅन्डची जाहिरात एकत्र केली होती आणि तेव्हा त्यांच्या जोडीला लोकांनी पसंतही केलं होतं. त्यामुळे हे पाहणं खूप इंट्रेस्टिंग असेल की निर्मात्यांनी अंतिम निवड करताना रश्मिका बाजी मारुन जाते की नाही.

अनुराग बसुंनी भट्ट कॅम्पसोबत याआधी 'गॅंगस्टार' आणि इतरही प्रोजेक्ट केले आहेत,तेच 'आशिकी ३' चे दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे आता अनुराग बसु दिग्दर्शक म्हणून कोणत्या अभिनेत्रीला पसंती देतात याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

'आशिकी' आणि 'आशिकी २' या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी पसंत केलं होतं. दोन्ही सिनेमांच्या गाण्यांनी लोकांच्या मनात घर केलं होतं. त्यामुळे आता 'आशिकी ३' च्या गाण्यांकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या असतील तर नवल नव्हे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT