Babita Phogat
Babita Phogat instagram
मनोरंजन

कुस्तीपट्टू बबिता फोगाटला झाली कैद; काय आहे प्रकरण..

प्रणाली मोरे

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे,ज्यात कुस्तीपट्टू(Wrestler) बबिता फोगाट (Babita Phogat) जेलमध्ये कैद असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्या व्हिडीओवरनं बबिताचे चाहते मात्र भलतेच चिंता व्यक्त करत त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काय दर्शवत आहे तो व्हिडीओ नेमकं,चला जाणून घेऊया. तर कंगना रनौतचा(Kangana Ranaut) 'लॉकअप' हा रिअॅलिटी शो २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या शो च्या चौथ्या स्पर्धकाची घोषणा करणारा प्रोमो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कारण ती चौथी स्पर्धक आहे 'रिअल दंगल गर्ल' बबिता फोगाट. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणाऱ्या या शो चे सगळेच जण खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत. शो चे तीन स्पर्धक आतापर्यंत कन्फर्म झाले होते. पण आता कुस्तीपट्टू बबिता फोगाट या शो ची चौथी स्पर्धक असल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. 'आता कंगनाच्या 'लॉकअप' मध्ये दंगल पहायला मिळणार', अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

या शो च्या नवीन प्रोमोत जेलमध्ये बबिता फोगाट बंदिस्त अवस्थेत दिसत आहे. या शो मध्ये राहण्यासाठी बबिता फोगाट आता आपल्याला अत्याचारी खेळ खेळताना दिसणार आहे. बबिता फोगाटच्या आयुष्यावर 'दंगल' सिनेमा बनला होता. त्यामुळे एक कुस्तीपट्टू म्हणून तिचं घडलेलं आयुष्य सगळ्यांनाच प्रेरित करुन गेलं होतं आणि त्यामुळे तिच्याविषयी अधिक कुतूहल प्रत्येकाच्या मनात आहे. 'दंगल' सिनेमा सुपरहिट ठरला होता. पण आता ही 'रिअल लाईफ दंगल गर्ल' कंगनाच्या जेलमध्ये काय हटके करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रोमोत बबिता म्हणतेय,''तुम्ही माझ्या आयुष्यावर बनलेला सिनेमा तर पाहिलात, पण आता मी येतेय खरी दंगल काय असते हे दाखवायला. बबीता फोगाट,हम कोई छोरों से कम हैं के''. बबितानं जेल मध्ये ऑरेंज रंगाचा जंपसूट घातलेला दिसत आहे. बबिताच्या हातात कंगनाने बेड्या घातल्यावर बबिता म्हणते कशी,''अब होगा असली दंगल''.

एकता कपूरने या शो चा हा प्रोमो शेअर करताना लिहिले आहे,''क्या रेसलर चैंपियन यहां से भी लेगी विनिंग वॉक-आउट या हो जाएंगी नॉकआउट?'' तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कुणी लिहिलंय,'आम्ही या शो ची आतुरतेने वाट पाहत आहोत'. तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय,'बबिता OMG..'. हा शो २७ फेब्रुवारीपासून 'बालाजी' आणि 'एमएक्स प्लेयर' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. बबिता व्यतिरिक्त नीशा रावल,मुनव्वर फारुकी आणि पूनम पांड्ये यांची नावं स्पर्धक म्हणून कन्फर्म झाली आहेत. अन्य स्पर्धकांची नावंही एक-एक करून समोर येतील. तब्बल ७२ दिवस हे स्पर्धक त्या जेलमध्ये राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT