Yash's KGF 3 to feature Bollywood actor Hrithik Roshan? Here's what makers have to say Google
मनोरंजन

'रॉकी भाई' च्या KGF 3 मध्ये हृतिकची वर्णी? निर्मात्यांचा मोठा खुलासा

बॉक्सऑफिसवर KGF 2 नं करोडोची कमाई करीत घोडदौड सुरु ठेवली असताना आता KGF 3 च्या कलाकारांवरुन चर्चा रंगलीय.

प्रणाली मोरे

KGF1 आणि KGF 2 नं इतिहास रचलाय हे आता वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या 46 दिवासांपासून सिनेमानं बॉक्सऑफिसवर आणि लोकांच्या मनावर कब्जा केलाय हे 1230 करोडची कमाई केल्यावर सिद्ध झालंय. दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे(Yash) तर आता महाराष्ट्रातही अनेक चाहते निर्माण झाले आहेत. यश नं साकारलेल्या रॉकी भाईला तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलंय. सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाली आहे. आणि आता त्यासोबत सिनेमात कोणते कलाकार असतील याची अफवा देखील पसरली आहे. KGF 3 साठी निर्मात्यांनी हृतिक रोशनला(Hrithik Roshan) संपर्क साधल्याची बातमी कानावर पडली होती.

गेल्या काही दिवसांपासून KGF 3 च्या कलाकारांविषयी अफवा पसरली होती . पण आता निर्मात्यांनी सिनेमाविषयी काही अपडेट दिल्या आहेत. ज्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. निर्माते-दिग्दर्शकांनी KGF 3 च्या कास्टिंग विषयी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

KGF 2 अजूनही बॉकस्ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आणि यातच निर्मात्यांनी सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली. या सिनेमातील भूमिकेसाठी हृतिक रोशनला संपर्क साधल्याची अफवा पसरली होती. आता केजीएफ च्या प्रॉडक्शन हाऊसचे को-सीईओ विजय किरागंदूर यांनी एका मुलाखतीत हृतिकच्या कास्टिंगविषयी खुलासा केला आहे. ते म्हणाले, ''केKGF 3 यावर्षी प्रदर्शित होणार नाही. आमचे काही प्लॅन्स आहेत,पण प्रशांत नील यावर्षी 'सालार' सिनेमात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे यश आपल्या नव्या सिनेमाची घोषणा करणार आहे. म्हणून आम्हाला वाटतं की प्रशांत नील आणि यश(Yash) जेव्हा आपलं काम संपवून एकत्र येतील तेव्हाचKGF 3 वर काम सुरू होईल. अद्याप आमच्याकडे याविषयी निश्चित तारखा आलेल्या नाहीत. त्यामुळे KGF 3 वर काम कधी सुरु होईल हे आता सांगता येणार नाही''.

पुढे ते म्हणाले,''एकदा तारखा निश्चित करण्यात आल्या की आम्ही कलाकारांविषयी अंतिम निर्णय घेऊ शकतो. जेव्हा सिनेमात इतर कलाकार घेण्याविषयी विचार केला जाईल ते देखील त्यांच्या इतर सिनेमांच्या शूटिंगवर अवलंबून असेल. आणि हे सगळं जेव्हा सिनेमाचं काम सुरू करण्यात येईल तेव्हाच शक्य होईल''.

KGF 3 सिनेमाला प्रशांत नीलनं लिहिलं देखील आहे आणि दिग्दर्शन देखील केलं आहे. होम्बले फिल्म्सच्या विजय किरागंदूरने तगडा खर्च करून सिनेमाला बनवलं आहे. या सिनेमात यश,संजय दत्त,रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी या मुख्य भूमिका होत्या. आता KGF 3 मध्ये हृतिक रोशन हा KGF 2 मधील संजय दत्तची जशी भूमिका होती तशाच पद्धतीच्या एखाद्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल अशी चर्चा मात्र रंगली आहे. निर्मात्यांनी मात्र हृतिकचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT