shefali shah. shefali shah news, shefali shah movies, shefali shah hot photos SAKAL
मनोरंजन

Shefali Shah: टीव्हीवर चांगली दिसतेस पण.. शेफाली शाहांची एअर होस्टेसने उडवली खिल्ली

शेफाली शाह यांना दिसण्यावरून थेट एअर होस्टेसचा टोमणा ऐकावा लागला होता

Devendra Jadhav

Shefali Shah News: हिंदी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शेफाली शाह. शेफाली शाह यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा शेयर केलाय. यात शेफाली शाह यांना दिसण्यावरून थेट एअर होस्टेसचा टोमणा ऐकावा लागला होता.

शेफाली शाह यांनी सोशल मीडियावर एक फ्लाईट मधला एक फोटो शेयर करत त्यांचा अनुभव सविस्तरपणे शेयर केलाय.

(You look good on TV but.. Shefali Shah mocked by air hostess)

हेही वाचा: Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेफाली शाहने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती फ्लाइटमध्ये झोपली आहे आणि तिच्या हातात एक पुस्तक आहे.

शेफालीचे केस मोकळे आणि काहीसे विखुरलेले आहेत. तिने कोणताही मेकअप केलेला नाही. फ्लाइटमध्येच शेफाली शाहसोबत घडलेली ही घटना तिने शेअर केलीय.

शेफाली म्हणाली.. सर्वात आश्चर्यकारक घटना काही वर्षांपूर्वी घडली जेव्हा एका व्यक्तीने टीव्ही पे तो अच्छी लगती है असे म्हटले होते. मला राग आला नाही. पण त्या एअर होस्टेसच्या सभ्यतेबद्दल मला आश्चर्य वाटले. मला त्या व्यक्तीला सडेतोड उत्तर द्यायचे होते.

पण त्याचा काही उपयोग होत नसल्याचे दिसत होते. पण मी तुम्हाला सांगते की मी परिपूर्ण नाही. मी पुतळा किंवा पेंटिंग नाही. मी जशी आहे तशी आहे खरी आहे."

अभिनेत्री शेफाली शाह ही इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रत्येक चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेने एक खास आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शेफाली शाह ही लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. शेफाली ही कोणत्याही भुमिकेत सहज बसते.

काहीच दिवसांपुर्वी शेफाली यांनी गर्दीच्या ठिकाणी तिच्याशी गैरवर्तन केल्याचं उघड झाले आहे. शेफाली अलीकडेच एका पॉडकास्टचा भाग बनली आहे.

यादरम्यान, तिने बाजारात गर्दीच्या ठिकाणी मध्यभागी तिच्यासोबत झालेल्या विनयभंगाची कहाणी शेअर केली.

शेफाली शाहने खुलासा केला की प्रत्येकजण यातून गेलं आहे. तिला आठवतं की बाजारात गर्दीत फिरत असतांना तिला चुकीच्या पद्धतिने स्पर्श केलं गेल होत. हे तिला खुपच फालतू वाटलं.

याबद्दल ती बोलली की, 'मी कधीही काहीही बोलले नाही कारण मी म्हणणार नाही की ही चूक होती पण ती फक्त... लाजिरवान आहे.' अशाप्रकारे शेफाली शाह यांनी सोशल मिडीयावर त्यांच्या आयुष्याचा अनुभव शेयर केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra : गोल्डन बॉयची नवी ओळख..! ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये 'लेफ्टनंट कर्नल' हा सन्मान प्रदान

Shubman Gill : पाकड्यांचे किडे वळवळले...! शुभमन गिलसोबत हात मिळवला अन् नंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा दिला, कॅप्टनने काय केले ते पाहा? Video

Abhyanga Snan Benefits: फक्त दिवाळीतच नाही! अभ्यंगस्नान शिशिर ऋतूपर्यंत करा आणि मिळवा वर्षभराची ऊर्जा

Daund News : दिवाळी पाडव्याला नानगावात शोककळा! तुटलेल्या केबलने घेतला खळदकर दांपत्याचा बळी; करडू वाचवताना झाला अपघात

Mangalwedha News : मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण, मनोज जरांगे पाटील सहित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमंत्रित

SCROLL FOR NEXT