Young actresses don’t want to work with Anil Kapoor! Tell what is the reason Google
मनोरंजन

अनिल कपूर सोबत काम करायला नकार देतात तरुण अभिनेत्री,समोर आलं कारण...

अनिल कपूर यांनी बॉलीवूडमध्ये जवळपास ४० वर्ष काम करुन अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचे झक्कास अभिनेत्याच्या रुपात ओळखले जाणारे अनिल कपूर(Anil Kapoor) आपल्या आगामी 'जुग जुग जियो'(Jug Jug Jiyo) सिनेमामुळे सध्या भलतेच चर्चेत आहेत. अनिल कपूर यांना बॉलीवूडमध्ये जवळपास ४० वर्ष झाली आहेत,आणि असं असलं तरी आजही त्यांना बॉक्सऑफिसचं टेन्शन आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं अनिल कपूरनं एव्हरग्रीन होण्याचा आणि धर्मा प्रॉडक्शन सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.(Young actresses don’t want to work with Anil Kapoor!)

गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्री मध्ये सक्रिय असल्यानंतरही अनिल कपूर सिनेमाला बॉक्सऑफिसवर मिळणाऱ्या यशाविषयी आजही टेन्शन घेताना दिसतात. याविषयी बोलताना ते म्हणाले,''खरंतर हे अवलंबून आहे की मी सिनेमात कोणासोबत काम करतोय. मी 'जुग जुग जियो' सिनेमाविषयी निश्चिंत आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी अनेक यशस्वी सिनेमे केले आहेत,त्यामुळे दडपण येतं ते खरंतर याच कारणामुळे. खासकरुन ज्या सिनेमांचे बजेट मोठे आहे त्यांचे टेन्शन मला जास्त येते. अशा खूप सिनेमांच्या प्रदर्शनावेळी मी टेन्शनमध्ये राहिलो आहे''.

अनिल कपूर 'जुग जुग जियो'च्या माध्यमातून पहिल्यांदाच धर्मा प्रॉडक्शनसोबत काम करीत आहेत. इतके वर्ष धर्मासोबत काम न केल्याविषयी अनिल कपूर म्हणाले आहेत की,''हा माझा सिनेमा आहे. करण जोहरच्या वडीलांसोबत माझं चांगलं नातं होतं. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मला एक सिनेमा ऑफर केला होता. ज्याचं कथानक मला पटलं नाही,तर मी नकार कळवला होता. त्यांना तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. तो सिनेमा मिस्टर.इंडियासोबतच प्रदर्शित झाला होता. आम्ही जेव्हाही भेटायचो,तेव्हा त्यांना म्हणायचो कि एक दिवस मी तुमच्यासोबत नक्की काम करेन. करण जोहर देखील नेहमी म्हणायचा की मला तुमच्यासोबत काम करायचे आहे. पण कुठे काही जुळून आलं नाही. आता आम्ही 'जुग जुग जियो' सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा काम करत आहोत''.

नीतू कपूर यांच्यासोबत पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव कसा होता याविषयी अनिल कपूर म्हणतात,''ऋषि कपूर होते तेव्हापासून मी नीतू कपूर यांना ओळखतो. पहिल्यांदा जेव्हा आम्ही सेटवर भेटलो तेव्हा मला वाटलं की माझ्या कुटुंबाचाच त्या एक भाग आहे. हा नीतू कपूर यांचा कमबॅक सिनेमा आहे. त्यामुळे आमचा फायदाच झाला,आणि मला एक चांगली सह-कलाकार मिळाली. जी खूप चांगली,सुंदर आणि उत्तम डान्स करणारी अभिनेत्री आहे. आता तरुण मुली माझ्यासोबत काम करायला पहात नाहीत. त्यांना आपल्या वयाच्या अभिनेत्यासोबतच काम करायचं असतं. तशा अजून पाच-सहा अभिनेत्री लिस्ट मध्ये आहेत माझ्या, ज्या सुंदर आहेत आणि तरुण अभिनेत्रींसमोर लय भारी आहेत. आणि यामध्ये माधुरी दिक्षित पहिल्या क्रमांकावर आहे''.

आपल्या एव्हरग्रीन लूकवर अनिल कपूर म्हणाले, ''हा लोकांचा पहाण्याचा दृष्टिकोन आहे ,त्यांचे प्रेम आहे. मला माहित होतं कायम मी काही हिरो बनून राहणार नाही. त्यामुळे वेळीच मी माझ्या वयाला शोभतील त्या भूमिका करायला सुरुवात केली. आणि त्याला साजेशे असे जेवढे मी सिनेमे केले त्या सगळ्यांनी बॉक्सऑफिसवर कमाल केली आहे. आणि माझ्या वयाला शोभतील अशा भूमिका मला आता खऱ्याअर्थानं आनंद देत आहेत. आता वरुणने 'जुग जुग जियो' मध्ये जे कॅरेक्टर केलं ते कुणी मला सांगितलं असतं तर कसं शक्य झालं असतं. मी त्याचा बाप म्हणूनच शोभेन नं. आणि लोक ही म्हणतातच की,आपल्या वयाला शोभेल असं वागा...''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Claims about Samosa, Jalebi, Laddu: 'समोसा, जिलबी अन् लाडू'बाबत सरकारने खरंच काही इशारा दिला आहे का?

Mumbai Local: वातानुकूलित प्रवास भोवला, फुकट्या प्रवाशांकडून चार कोटींचा दंड वसूल

Umarga Crime News : अनैतिक संबंध, चारित्राच्या संशयावरून महिलेचा खुन; उमरगा पोलिसांनी २४ तासात प्रियकराला केली अटक

Sarpanch Reservation : बीडमधील गेवराईत ७१ महिला होणार सरपंच, १३९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Nina Kutina: गोकर्णच्या जंगलातील गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचा शोध कसा लागला? पोलिसांनी सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT