Zara Hatke Zara Bachke BO Esakal
मनोरंजन

Zara Hatke Zara Bachke BO: निर्मात्यांची आयडिया आली कामात! पहिल्यांच दिवशी चित्रपटानं कमावले 'इतके' कोटी...

Vaishali Patil

सारा अली खान आणि विकी कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे. हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी आहे ज्यामध्ये सारा अली खान पहिल्यांदाच विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करत आहे.

ZHZB स्टार्सनीही चित्रपटाचं भरपूर प्रमोशनही केले आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाला प्रेक्षकांना कसा प्रतिसाद मिळाला हे जाणुन घेण्यासाठी चाहते उत्सूक आहेत. आता या चित्रटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहे.

रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकी आणि साराची जोडी खूप आवडली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरून याचा अंदाज येतो.

(zara hatke zara bachke box office collection day 1)

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.49 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला हे कलेक्शन वाढण्याची अपेक्षा आहे. विकी आणि साराचा चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाजही आहे.

रिलीझच्या आधी संध्याकाळी बाय वन गेट वन ऑफरमुळे, तिकीटांच्या विक्रित वाढ दिसून आली. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसने पहिल्या दिवशी जवळपास 3.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

बाय वन गेट वन ची ऑफर लोकांना खूप भुरळ पाडणारी होती आणि त्यामुळे प्रचंड गर्दीही थिएटरमध्ये जमली. तर अंदाजानुसार, पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपट 15 कोटींची कमाई करू शकतो.

'जरा हटके जरा बचके' हा विकी कौशलचा दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. विकीचा पहिला सर्वात मोठा ओपनर चित्रपट 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' होता. तर दुसरीकडे साराचा 'सिम्बा', 'लव्ह आज कल 2' आणि 'केदारनाथ' नंतर ही चौथा मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे.

सारा आणि विकीचे शेवटचे काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. असे असतानाही ही स्टार जोडी प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, आता चित्रपट एकूण किती कमाई करतो हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT