Zara Hatke Zara Bachke Trailer  
मनोरंजन

Zara Hatke Zara Bachke Trailer : 'आचरट नवरा, चावट बायको!' पिक्चर बघावाच लागतोय

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असलेला जरा हटके जरा बचके नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Zara Hatke Zara Bachke Trailer Sara Ali Khan Vicky Kaushal : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असलेला जरा हटके जरा बचके नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यातील सारा अन् विकीच्या वेगळ्या अंदाजाचे प्रेक्षकांनी स्वागत केले आहे.

सारा अली खान आणि विकीची भूमिका असलेला जरा हटके जरा बचकेचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर या दोन्ही सेलिब्रेटींना तुमचा हा चित्रपट तरी बॉक्स ऑफिसवर चालेल अशी अपेक्षा आहे अशी टोमणाबाजी त्यांना सुरु केली आहे. याचे कारण सारा अली खानच्या यापूर्वीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

Also Read -Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विकी कौशल विषयी बोलायचे झाल्यास त्याचा सरदार उधमनंतर प्रेक्षकांच्या कौतूकास पात्र होईल असा चित्रपट आलेला नाही. भलेही विकीवर वेगवेगळ्या पुरस्कारांचा वर्षाव झाला असेल पण अजुन त्याला मेगा हिट, ब्लॉकबस्टरसाठी आणखी संघर्ष करावा लागतो आहे. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये विकीच्या भूमिकेचं कौतूक होताना दिसत असून चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हायरल झालेल्या ट्रेलरमध्ये विकी कौशल आणि सारा अली खानचा तो बेधडक अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे. त्या दोघांनी पती पत्नीची भूमिका केल्याचे दिसून येत आहे. चित्रपटातील संवादही लक्षवेधी आहेत. काही करुन तिला तिच्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे. वैवाहिक नात्याला लागलेली घरघर, प्रेमाचं व्देषात झालेलं रुपांतर आणि गोड दिवस सरल्यावर आलेले कटू दिवस हे सारं काही त्या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.

जियो स्टुडिओ आणि दिनेश विजन यांनी जरा हटके जरा बचके या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. त्याच्या लेखनाची जबाबदारी देखील उत्तेकर यांनी पार पाडली आहे. विकी कौशल, सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दोन जुन रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT