Chandravilas, Chandravilas new serial, vaibhav mangle, Chandravilas starcast SAKAL
मनोरंजन

Chandravilas: अखेर उलट्या फोटोंचे गुढ उकलले! हा कलाकार भरवणार उरात धडकी, नवी मालिका

झी मराठीवर नवी मालिका सुरु होत आहे

Devendra Jadhav

Chandravilas New Serial: काहीच वेळापूर्वी झी मराठीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. झी मराठीचं इंस्टाग्राम आणि फेसबुक सगळ्याच ठिकाणी झी मराठीचा लोगो आणि इतर पोस्ट्स उलट्या दिसू लागल्या होत्या.

पण अखेर हे का झालं याचा उलगडा झाला असून हि झी मराठीची प्रमोशनल कल्पना होती. झी मराठीवर हॉरर पद्धतीची नवीन मालिका सुरू होतेय तिचं नाव चंद्रविलास.

(zee marathi new serial chandravilas coming soon)

ही गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ या दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात.

ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतं, ते या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा.

त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे.

चंद्रविलासमधला वास्तव्याचा काळ हा अनंत आणि शर्वरी या बाप-लेकीमधल्या प्रेमाची परीक्षा पाहणारा कसोटीचा काळ असणार आहे.

दुष्टशक्तींच्या अचाट सामर्थ्यापुढे वडील-मुलीतल्या प्रेमाचा निभाव लागेल का, अनंत आपल्या लाडक्या मुलीला संकटातून वाचवू शकेल का, हे या उत्कंठावर्धक मालिकेत पाहायला मिळणार आहे.

प्रत्येक भागागणिक एक नवा खुलासा आणि दर खुलाशामागे एक नवी कहाणी असलेली ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होईल, ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत वैभव मांगले असणार आहे.

वैभव मांगलेचा हा नवीन लुक प्रेक्षकांना नक्कीच भावेल यात शंकाच नाही. मालिकेचं लेखन केलंय समीर गरुड आणि प्रसाद जोशी यांनी. २७ मार्चपासून रात्री ११ वा. "चंद्रविलास" ही भयकथा झी मराठीवर बघायला मिळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT