Bharat Jodo Yatra Maharashtra sakal
Maratha Agitation

Bharat Jodo Yatra : ‘भारत का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’

हिंगोलीत विविध घोषणांसह ढोलताशांच्या गजरात भारत जोडो यात्रेचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : ढोलताशांसह टाळ मृदंगाचा गजर अन् लेझीम पथकाच्या निनादात भारत जोडो पदयात्रेचे सोमवारी (ता. १४) सकाळी शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी यात्रेकरूंची लांबच लांब रांगही दिसून आली. यात्रेचा जिल्ह्यातील सोमवारी चौथा दिवस होता.

पदयात्रा शहरात दाखल होण्याची वेळ सकाळी सातची होती. पण, शहरालगत असलेल्या सावरखेडा येथील नॅशनल हायवे पुलाजवळ माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, सुनील पाटील गोरेगावकर, रणजित पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी सहा वाजल्यापासूनच दाखल झाले होते. यात्रेत हिंगोलीसह सांगली, कोल्हापूर, लातूर आदी ठिकाणावरून पदाधिकारी आले होते.

या ठिकाणी भजनी मंडळाने भक्तिगीते सादर केली. लेझीम पथकाने विविध प्रात्यक्षिके सादर केली. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, युवती, साहित्यिक, वारकरी आदी चालताना आढळून आले. यात्रा शहरात आल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘भारत का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’, ‘नफरत छोडो, भारत जोडो’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

हातात झेंडे, अंगात भारत जोडो यात्रेच्या नावाचे राहुल गांधी व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा फोटो असलेले टी शर्ट तर विश्वजित कदम यांच्या नाव असलेल्या टोप्या डोक्यात घालून पदाधिकारी यात्रेत सहभागी झाले होते. यात्रा मार्गावर नाश्ता, केळी व पाणी पाऊच आदींचे वाटप करण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजता यात्रा शहरातील शिवलीला पॅलेस येथे पोहचल्यावर येथे राहुल गांधी व इतरांना नाश्ता देण्यात आला.

यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजीमंत्री वर्षा गायकवाड, आमदार विश्वजित कदम, आमदार प्रज्ञा सातव, आमदार अमित देशमुख, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हिंगोलीत राहुल गांधी यांचे जंगी स्वागत

हिंगोली : स्वातंत्र्य, एकता, समानता व अखंडता ही संकल्पना घेऊन भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा सोमवारी (ता. १४) शहरात दाखल झाली. यावेळी स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यासाठी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काटेकोरपणे केलेल्या नियोजनाचे हे यश असल्याचे बोलले जात होते. खासदार राहुल गांधी यांचे पदयात्रेदरम्यान विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पदयात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT