arrested
arrested 
मराठवाडा

व्हीजा काढून देणाऱ्या भामट्याला गुजरातमध्ये अटक 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : परदेशात जाण्यासाठी लागणारा व्हीजा काढून देतो म्हणून एकाची फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या भामट्याला इतवारा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 21 आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

शहराच्या दशमेशनगर भागात राहणारा हरप्रितसिंग ढिल्लो (वय 30) या व्यापाऱ्याची पत्नी अकांऊटींगचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आॅस्ट्रेलिया येथे वास्तव्यास आहे. पत्नीकडे राहण्यासाठी लागणारा व्हीजा या महत्वाच्या कागदपत्रासाठी हरप्रितसिंग खूप दिवसापासून प्रयत्नात होता. परंतु त्यांना व्हीजा काही त्रुटीमुळे मिळत नव्हता. अखेर त्यांनी मिळालेल्या माहितीवरुन इंदौर येथील डेल्टा कन्सलटन्सीकडे संपर्क साधला. यावेळी कन्सलटन्सीचे निमेश चंद्रकांत पटेल (वय 39, रा. गणपतपूरा करझन, गुजरात) यांनी नांदेड गाठून हरप्रितसिंग ढिल्लो यांच्याशी संपर्क साधला. चार आॅगस्ट 2018 ते सहा आॅक्टोबर यादरम्यान संपर्क वाढवित व्हीजा काढून देतो. संबंध देशभर माझे हेच काम आहे. असे म्हणून ढील्लो यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याचा मित्र असलेला तेंजींद्रसिंग गील याला कॅनडामध्ये नोकरी लावतो म्हणून त्याच्याकडून दीड लाख रुपये बँकेमार्फत घेतले.

त्यानंतर तो निघून गेल्यानंतर उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. एवढेच नाही तर त्याने आपला मोबाईल नंबर बदलून टाकला. याप्रकरणी इतवारा ठाण्यात निमेश पटेलविरूध्द गुन्हा दाखल झाला. डीवायएसपी धनंजय पाटील आणि पीआय साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नंदकिशोर सोळंके यांनी सायबर लॅबची मदत घेत गुजरात गाठले. चार दिवस गुजरातमध्ये तळ ठोकून सायबरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवत अखेर आरोपी निमेश पटेलपर्यंत पोहचले. त्याला अटक करून नांदेडला गुरूवारी (ता. 18) पहाटे आणले. दुपारी न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. पटेल याने देशभरात अनेकांना व्हीजाच्या नावाखाली गंडा घातल्याचे समोर येत असल्याचे सोळंके यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT