file photo 
मराठवाडा

 १०८ रुग्णवाहिकेमुळे मिळाले जीवदान

अच्यूत जोगदंड

पूर्णा (जि.परभणी) : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे खासगी रुग्णालये जवळपास बंद असून शासकीय रुग्णालयावरच सर्व भिस्त आहे. त्यात अपत्तीप्रसंगीही कोणी फोन घेण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत गौर (ता.पूर्णा) येथे मंगळवारी (ता. १४) वीज पडून दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना १०८ रुग्णवाहिकेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले आहे. दरम्यान, बुधवारी (ता.१५) त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे.

गौर (ता.पूर्णा, जि.परभणी) येथे मंगळवारी (ता.१४) पहाटे अचानक वातावणात बदल होऊन विजेचा कडकडाटांसह २० मिनिटे पाऊस झाला. दरम्यान, सचिन सदाशिव जोगदंड व संतोष दगडु जोगदंड हे काढलेल्या हळदीच्या ढगावर ताडपत्री झाकत असताना जवळच वीज कोसळली. त्यात दोघेही बेशुद्ध पडले. त्यांच्या शरीरावरील त्वचा व केस भाजल्याने गंभीर जखमी झाले.

लॉकडाउनमुळे खासगी वहान येणे शक्य नव्हते. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव जोगदंड यांनी १०८ नंबरवर फोन केला. दक्ष असलेल्या आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पंधरा मिनिटांमध्ये घटनास्थळी पोचवून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात सचिन जोगदंड व संतोष जोगदंड यांना पहाटे चार वाजता दाखल केले. त्यांच्यावर या ठिकाणी उपचार करण्यात आले. 


आठ तासांनी ते दोघेही शुद्धीवर आले. त्यांची प्रकृती चांगली असल्याने त्यांना बुधवारी (ता. १५) रुग्णालयातून सुटी देण्यात आली. १०८ रुग्णवाहिका वेळीच आल्याने त्यांच्यावर उपचार झाले. त्यामुळे दोघांनाही जीवदान मिळाले.

हेही वाचा व पहा - Video: भुकेल्यांसाठी शिवभोजनाची थाळी ठरतेय तारक

अडचणीच्या प्रसंगी संपर्क करा
नैसर्गिक चक्र कोलमंडले आहे म्हणून वातावरणात बदल झाला तर शेतात काम रात्रीची जागल राखन करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांनी नैसर्गिक आपत्ती साप चावला, वीज कोसळली, गारा पडल्यामुळे जखमी झाले व अन्य इतर अडचणीच्या प्रसंगी तत्काळ १०८ नंबरवर फोन करावे, त्यामुळेच वेळेत दवाखान्यात दाखल करता येईल, असे अवाहन आरोग्य अधिकारी डॉ. एन. एन. देशमुख यांनी केले.
 

मला जीवदान मिळाले
मला जीवदान मिळाले ते पूर्णा आरोग्य विभागाच्या रुग्ण वाहिकेमुळे. नाहीतर कोरोनामुळे खासगी वाहन चालक फोन केला तरी फोन उचलत नाहीत.
- सचिन सदाशिव जोगदंड
जखमी रुग्ण, गौर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT