hingoli photo 
मराठवाडा

सव्वा लाखाचे पाणी पाऊच साहित्य जप्त 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : नगरपरिषदेतर्फे शहरात दोन दिवसांपासून प्लॅस्टिक जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी (ता.१५) शहरातील हनुमान नगरातील एका गोदामावर छापा टाकून तब्बल एक लाख दहा हजार रुपये किमतीचे पाणी पाऊच साहित्य जप्त केले.

नगरपरिषदेतर्फे शहरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळावा, यासाठी वारंवार जनजागृती केली जात आहे. मात्र, अनेकजण प्लास्टिकचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छ भारत मिशनला अडथळा निर्माण होत आहे. या बाबत दोन दिवसांपासून प्लॅस्टिक जप्तीची मोहीम राबविली जात आहे. 

हनुमान नगरात कारवाई

शनिवारी मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या पथकाने शहरातील दुकांनामध्ये असलेले प्लॅस्टिक जप्त करण्यास सुरवात केली. शहरातील हनुमान नगरात हे पथक पोचले असता या भागातील पाणी पाऊच बनविणारे मनोज शर्मा यांच्या गुरूप्रकाश ॲक्‍वा प्लांट दुकानात तब्‍बल एक लाख दहा हजार रुपये किमतीचे पाणी पाऊचचे साहित्य आढळून आले. हे साहित्य जप्त करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

रोड रोलरद्वारे पाणी पाऊच नष्ट 

 दरम्यान, श्री. शर्मा यांनी नगरपरिषदेकडून रहिवासी क्षेत्राकरीता नळ जोडणी घेऊन अनाधिकृतपणे व्यवसायासाठी वापर सुरू केला होता. या नळजोडणीवरूनच पाण्याचे पाऊच तयार करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे २४ हजार ७८० रुपये व्यावसायिक नळ वापराबाबत वसूल करण्यात आले. दरम्यान, जप्त केलेले साहित्य व पाणी पाऊच ट्रकमध्ये भरून संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर आणले. या ठिकाणी रोड रोलरद्वारे पाणी पाऊच नष्ट करण्यात आले. सिंगल युज प्लॅस्टिक बंदी अंतर्गत शासनाने पाणी पाऊचवर सुद्धा बंदी घातलेली आहे.

पथकात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश

 व्यापाऱ्यांनी पाणी पाऊचची विक्री व नागरिकांनी त्‍याचा वापर करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले आहे. या पथकात मुख्याधिकारी रामदास पाटील, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, पाणी पुरवठा अभियंता गजानन हिरेमठ, स्‍वच्‍छता अभियंता सनोबार तसनीम, स्‍वच्‍छता निरीक्षक बाळू बांगर, रचना सहायक किशोर काकडे, मयूर शिवशेटे, स्‍थापत्य अभियंता रवीराज दरक, पंडित मस्‍के, प्रवीण चव्हाण, गजानन बांगर, नितीन पहिनकर, दिनेश वर्मा, सविता घनसावंत, अमरसिंग ठाकूर आदींचा समावेश होता.

शुक्रवारी साठ दुकानांची तपासणी

मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ५० ते ६० दुकानांची तपासणी करण्यात आली. या वेळी २३ दुकानदारांकडे २१५ किलोग्रॅम प्लॅस्टिक आढळून आले. प्लॅस्टिक जप्त करून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT