Jeep
Jeep  
मराठवाडा

काळीपिवळी जीप उलटली, पंधरा जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड  (जि.औरंगाबाद ) : सिल्लोड-कन्नड रस्त्यावर शुक्रवारी (ता. 29) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या काळीपिवळी जीपचे चाक निखळून पडल्यामुळे दोन-तीनवेळा उलटून जीप रस्त्याच्या खाली जाऊन पडली. या अपघातात जीपमधील पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.
सिल्लोड-कन्नड रस्त्याचे काम सुरू असून, पर्यायी रस्त्याचीही दुरवस्था  झाली आहे. त्यातच जुनाट आणि खिळखिळ्या झालेल्या खासगी प्रवासी वाहनांमधून जीव मुठीत धरूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. शुक्रवारी सकाळी काळीपिवळी जीपमधून शिक्षक प्रवास करीत होते. सिल्लोड येथून घाटनांद्राकडे ही जीप (एमएच-20 - 149) भरधाव जात होती. जीपचे चाक निखळून पडल्यामुळे जीप दोन-तीनवेळा उलटून रस्त्याच्या खाली जाऊन पडली.

या अपघातात रूपाली भगवान अंभोरे, स्वप्नील अर्जुन राठोड, संगीता सर्जेराव मोरे, राजश्री संजय लांडगे, शांताराम महादू गायकवाड, रूपा हनुमंतराव,  राजेंद्र सांडू शिंदे, दीपाली रत्नाकर क्षीरसागर, रेखा राजू टाकसाळे, कविता विठ्ठलदगडघाटे हे प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही प्रवाशांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त जीपचा चुराडा झाला आहे.

कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू
नागापूर (जि.औरंगाबाद) : चिमणापूर (ता.कन्नड) परिसरातील आंबेगाव खुर्द शिवारातील गट क्रमांक दोनमधील विहिरीत पडून मध्य प्रदेश येथील कामगार संजय ग्यानसिंग ब्राह्मणे (वय 25) यांचा मृत्यू झाला. ते कुटुंबासहित बऱ्याच दिवसांपासून मध्य प्रदेशहून चिमणापूर येथील प्रकाश गाडेकर यांच्या शेतात कामासाठी आलेले आहे.

गुरुवारी (ता.28) सायंकाळी सातदरम्यान संजय ब्राह्मणे हे विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेले असता तोल जाऊन विहिरीत पडले. विहिरीला पाणी भरपूर असल्याने व पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना लवकर लक्षात न आल्याने शुक्रवारी (ता.29) सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान संजय ब्राह्मणे यांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला.

या घटनेची माहिती खोलापूर येथील पोलिस पाटील मनसबअली सय्यद यांनी पिशोर पोलिस ठाण्याला कळवल्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विजय आहेर, पोलिस नाईक कैलास वाघ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृताचे करंजखेड येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली, असून तपास सहायक पोलिस निरीक्षक जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक कैलास वाघ हे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT