19 new cases of COVID-19 in Osmanabad District 
मराठवाडा

Coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात १९ नवे रुग्ण

तानाजी जाधववर

उस्मानाबाद : जिल्ह्यातील दोन दिवसांचे कोरोना संशयिताच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित होते. ते शनिवारी (ता. ११) प्राप्त झाले. त्यामध्ये तब्बल १९ जणांच्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३५४ वर गेली आहे. 

नव्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील एक शेकापूर, एक तुगाव आणि दोन उस्मानाबाद शहरातील आहेत. शहरातील रुग्णांपैकी एक रामनगर व एक नेहरू चौक येथील आहे. उस्मानाबाद कारागृहात सहा कैद्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. भूम तालुक्यामध्ये पाचजणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील एक वालवड, चार राळेसांगवी येथील
आहेत. उमरगा तालुक्यामध्ये चार आढळले. त्यामध्ये उमरगा शहरातच तीन व एक मुरूम येथील आहे. अशा प्रकारे १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारपर्यंत २२८ जण कोरोनातून बरे झाले तर १४ जणांचा मृत्यू झाला. ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 

पंधरा दिवसांत ५६ जण पॉझिटिव्ह  
उमरगा : गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात कोरोनाचे ५६ रुग्ण आढळले. दरम्यान, शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री आलेल्या अहवालात शहरातील एक खासगी डॉक्टरसह तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  तालुक्यातून आठ व नऊ तारखेला पाठविण्यात आलेल्या पंधरा स्वॅबचा अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात १४ जण निगेटिव्ह आले, तर उपजिल्हा रुग्णालयातील एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आली आहे. उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत रुग्णसंख्या ७४ झाली आहे. त्यात पंधरा दिवसांत तब्बल ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. उमरगा शहरातील रुग्णसंख्या ३४ झाली आहे. 

खासगी डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह 
शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात सतरापैकी चारजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एका खासगी डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अन्य रुग्णांमध्ये परिचारिकेचा एक मुलगा, कुंभारपट्टी भागातील एक सेवानिवृत्त शिक्षक, तर मुरूमच्या एक चहा विक्रेत्याचा समावेश आहे. 

औरंगाबादच्या बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औषधी विक्रेत्याचा मृत्यू 
शुक्रवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयात एका औषधी विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला याची अधिकृत माहिती स्वॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजणार आहे. त्याच्यावर कोविड नियमांनुसार आरोग्य कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
  
येरमाळा येथे ज्येष्ठ नागरिकाला बाधा 
कळंब : तालुक्यातील येरमाळा येथील वाणी गल्लीतील एका ६५ वर्षीय पुरुषाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने हा परिसर कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.  संबंधित रुग्ण हा बार्शी येथे औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात गेला होता. त्या ठिकाणी त्याचा बाधिताशी संपर्क आला. त्यानंतर कोरोनाची लक्षणे
दिसल्याने चाचपणी करण्यात आली. त्याच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्या संपर्कातील सात व्यक्तींना येथील कोरोना सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. दोन महिन्यांनंतर तालुक्यात कोरोना रुग्ण सापडला आहे. 

मुरूममध्ये हॉटेल व्यावसायिक बाधित 
मुरूम : शहरातील यशवंतनगर भागातील एक हॉटेल व्यावसायिकाच्या कोरोना चाचणीला पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी सकाळी शहरातील यशवंतनगर भाग सील करण्यात आला. उपविभागीय महसूल अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, मुरूम पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यशवंत बारवकर, पोलिस उपनिरीक्षक
शिवदर्शन बिरादार, वैद्यकीय अधीक्षक वसंत बाबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक हेमंत देशपांडे, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे आदींनी पाहणी केली. दरम्यान, परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येऊन ५० घरांतील सदस्यांची तपासणी करण्यात आली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT