फोटो 
मराठवाडा

१७ जणांकडून ४०० लीटर हातभट्टी दारु जप्त- निलेश सांगडे 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या जिल्ह्यात देशी दारु, विदेशी दारु, हातभट्टी, शिंदी आणि परराज्याती बनावट दारु अवैध मार्गाने विक्री करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हा अधीक्षकनिलेश सांगडे यांच्या आदेशावरुन विशेष व भरारी पथकांनी मुदखेड तालुक्यात केलेल्या कारवाईत सतरा जणांना अटक करुन त्यांच्याकडून साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (ता. १४) सायंकाळच्या सुमारास चिकाळा तांडा परिसरात केली. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या चिकाळा तांडा परिसरातील १७ जणांना आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडशी कारवाई करत ताब्यात घेतले. तर त्यांच्याकडून ३८५ लिटर गावठी दारूसह नऊ दुचाकी असा सहा लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काही भागात गावठी दारू तयार करून विक्री

जिल्ह्यात सध्या संचारबंदी आणि लॉकडाऊन आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासन व प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. अशा परिस्थितीत दारू दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु काही भागात गावठी दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग मिळाली होती.

१० कारवाईत नऊ दुचाकी, एक ऑटो, ३८५ लिटर गावठी दारु

जिल्हाधिकारी डॉ विपिन, राज्य उत्पादन विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या निर्देशानुसार ता. १४ एप्रिल रोजी मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा परिसरात सापळे लावून कारवाई करण्यात आली. यावेळी १० कारवाईत नऊ दुचाकी, एक ऑटो, ३८५ लिटर गावठी दारुसह १७ जणांना ताब्यात घेतले. आरोपी व मुद्देमाल नांदेड येथे आणण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयास भेट दिली. तब्बल सहा लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या पथकांचे कौतुक करण्यात येत आहे.

यांनी घेतले परिश्रम 

या कारवाईत निरीक्षक एस. एम. बोधमवाड, दुय्यम निरीक्षक वार. एस. लोळे, एक. के. शिंदे, बी. एस.
मंडलवार, के. के. किरतवाड, मो. रफी, बी. एम. पवार, जी. एन. भालेराव, आर. एस. बोधमवाड, डी. के. जाधव, एस. जी. संगेवार, यु. डी. राठोड यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT