file photo 
मराठवाडा

अर्धापूर दुय्यम निबंधक कार्यालयात ४० लाखाचा अपहार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय (वर्ग -१) येथे डाटा इंट्री आॅपरेटरने दस्त नोंदणीसाठी आवश्‍यक असलेले आॅनलाईन ई- चालन बनावट तयार करून शासनास मिळणाऱ्या ४० लाख रूपयांचा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. 
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अर्धापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय (वर्ग- १) येथे डाटा इंट्री कार्यरत असतांना पांडुरंग व्य॔कट कुलकर्णी रा. बिसेननगर व्हीआयपी रोड, नांदेड व नारायण प्रकाश शेवाळकर यांनी संगनमत करून ता. २५ एप्रिल २०१४ ते ता. २५ फेब्रुवारी २०१८ या दरम्यानच्या त्यांच्या डाटा इंट्री आॅपरेटर म्हणून नियुक्तीच्या कालावधीत ई- चालनामध्ये दस्त नोंदणी करण्यासाठी दस्ताऐवजी डाटा इंट्री करतांना ई -चालन हा प्रकार नाही निवडता चुकीचे इतर पर्यायाचा  (अभिनिर्णय जनरल स्टॅम ) हे प्रकार घेऊन दस्ताची डाटा इंट्री केली. त्यामुळे दस्ताच्या पावतीवर दस्त गोषवारा भाग १ वर व इंडेक्सवर भरलेला मुद्रांक दिसुन आला. 

जवळपास ४० लाखाचा अपहार

नोंदणी फीसाठी जेंव्हा नेट बी. एस. एन. एल. कनेक्टीव्हिटी नसतांना मॅन्युअल नोंदणी करतांना नोंदणी फीचे ई- चलन हे बनावट करून जोडले आहेत. ते बनावट चलन पुन्हा डिफेश करून पुन्हा दस्तसोबत जोडले आहे. अशा पध्दतीने बनावट चलनाद्वारे नोंदणी फी भरल्याचे भासवुन ३९ लाख ९५ हजार २७० रुपये शासनाचा महसूल शासनाकडे जमा न करता जमा केल्याचे भासवून बनावट ई चलन सादर करून आरोपी पांडुरंग व्यंकट कुलकर्णी रा. बिसेननगर नांदेड, नारायण प्रकाश शेवाळकर रा. हडको यांनी फसवणूक केली. 

तपास आर्थीक गुन्हे शाखेकडे

अशी फिर्याद प्रभारी दुय्यम निबंधक गोपीनाथ मारोतराव गडगिळे यांनी अर्धापूर पोलिसात दिली आहे. या फिर्यादीनुसार संगनमताने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अर्धापूर पोलिसांनी विविध कलमान्वये पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी गुन्हा दाखल केला. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Shubhanshu Shukla: आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, पंतप्रधानांना अभिमान...; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर उतरताच प्रतिक्रिया काय होती?

Sangli Researcher : संशोधक घडत नसतो, घडवावा लागतो, सांगलीतील चहावाल्याचं पोरगं बनतंय टेक्नोलॉजी मास्टर; ड्रंक अँड ड्राईव्हला बसणार चाप

Nashik Kumbh Mela : महापालिकेचा टीडीआर प्लॅन; कुंभमेळ्यासाठी भूखंड ताब्यात घेण्याची तयारी

Mumbai Metro: मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी! मेट्रो संख्येत होणार वाढ, किती मिनिटाला धावणार ट्रेन?

SCROLL FOR NEXT