file photo
file photo 
मराठवाडा

‘कोरोना’च्या उपाययोजनेसाठी शाळा आली धावून

सकाळ वृत्तसेवा

परभणी : नेताजी सुभाष शिक्षण मंडळ संचलित भारतीय बाल विद्यामंदिरच्या वतीने शनिवारी (ता. २८)  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

भारतीय बाल विद्यामंदिरच्या वतीने नेहमीच सामाजिक भावना जोपासली जाते. यापूर्वीदेखील राज्यावर आलेल्या विविध संकटांचा सामना करण्यासाठी शासनाला मदतीचा हात दिला आहे. यापूर्वी राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्‍भवली असता एक वेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह व राहुल रंजन महिवाल यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी ५१ हजार रुपयांची मदत दिली आहे. सध्या तर ‘कोरोना’चे संकट देशासह महाराष्ट्रावर घोंगावत आहे. शासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रतिबंधक उपाययोजनांवर मोठा खर्च होत आहे. त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने  शनिवारी (ता. २८) संस्थेचे अध्यक्ष सुभाष सिंघवी, सचिव रामविलास मुंदडा यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. या वेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, मुख्याध्यापक आनंद देशमुख, टी. आर. चौहान आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा ...

‘जनसेवा’तर्फे गरजूंना धान्य वाटप

सोनपेठ (जि. परभणी) : सोनपेठ शहरातील तीनशे गरजू कुटुंबांना जनसेवा मित्र मंडळाने पाच किलो धान्य उपलब्ध करून दिले. ‘कोरोना’मुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची उपासमार होत आहे. त्यामुळे  सेवाभावी व्यक्तीनीं अशा कुटुंबांची मदत करावी, असे आवाहान सोनपेठचे तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत जनसेवा मित्र मंडळाचे साजेद कुरेशी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एका कुटुंबाला पाच किलो धान्य उपलब्ध करून दिले. जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने शहरातील तीनशे गरजू कुटुंबांना धान्याची मदत करण्यात आली. यासाठी जनसेवा मित्र मंडळाचे साजेद खुरेशी, मंजूर मुल्ला, सलमान राज, मतीन राज, वाजेद खुरेशी, अश्फाक अंसारी, बाबा राज, सोफियान खुरेशी, मतीन राज, सलमान जिजा यांच्यासह मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT