ambad ganja.jpg
ambad ganja.jpg 
मराठवाडा

जालना : रवाना शेतशिवारातून 71 किलो गांजा जप्त  

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रवाना शेतशिवारातील शेतकरी गुलाबराव भगवानराव माने यांचे शेतातील कपाशीच्या पिकात गांजाची झाडे लावलेली असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंबड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी या घटनेवर तात्काळ लक्ष केंद्रीत केले. त्यांनी पोलिस पथकासह रवाना येथील शेतकरी गुलाबराव माने यांचे शेतात शनिवारी (28) दुपारी धाड टाकली. 

यावेळी कपाशीच्या पिकात असलेल्या तुरीच्या रांगामध्ये लावलेली 58 गांजाची झाडे आढळून आली. तसेच त्याठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या कापसाच्या गंजीत साठवून ठेवलेला दोन गोण्यातील साडे तीन किलो वाळलेला गांजा आढळून आला. तसेच या कारवाई दरम्यान ओला गांजा 68 किलो व वाळलेला गांजा साडे तीन किलो असा एकूण 71 किलो 500 ग्राम गांजा अंबड पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलिस उपनिरिक्षक सुग्रीव चाटे, पोलिस कर्मचारी श्री नारायण शेळके, विष्णू चव्हाण, सतीश देशमुख, महेंद्र गायके, लहाने, जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यातील संशयित गुलाबराव माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT