Crime Sakal
मराठवाडा

बनावट रेमडेसिव्हर दिल्याचा आरोप! डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

सुस्मिता वडतिले

उदगीर (लातूर) : कोरोना बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी येथे बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन देऊन ९० हजारांची फसवणूक केल्याची तक्रार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी रविवारी (ता. १८) शहरातील दोन डॉक्टरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, इंजेक्शन खरे आणि होते की बनावट हे प्रयोगशाळेतील अहवालानंतर कळणार आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महेशकुमार त्र्यंबकराव जिवणे यांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार, ता. १७ एप्रिल ते २ मे च्या दरम्यान उदयगिरी हॉस्पिटलमध्ये फिर्यादीने त्यांच्या आईस उपचारासाठी दाखल केले होते.

यावेळी डॉ. माधव चंबुले आणि डॉ. नामदेव गिरी यांनी फिर्यादीच्या आईस उपचारासाठी बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन देऊन ९० हजार रुपयांची फसवणूक केली, असा आरोप तक्रारीमध्ये जिवणे यांनी केला. त्या आधारे पोलिसांनी रेमडेसिव्हर इंजेक्शन जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे तपास अधिकारी साहाय्यक पोलिस निरीक्षक नौशाद पठाण यांनी सांगितले. याप्रकरणी डॉ. चंबुले व डॉ. गिरी या दोघांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP: ना परीक्षा, ना शारीरिक चाचणी; खेळाडूंना शैक्षणिक पात्रतेतही सूट! दरवर्षी निघणार पोलीस उपनिरीक्षकांची पदे

Latur: लातूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके; तापमान ३८ अंशांवर; औराद शहाजनी चाळिशीच्या उंबरठ्यावर

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर; सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

Mahabaleshwar ST Bus: महाबळेश्वरमध्ये नव्या एसटी बसची एंट्री; आकर्षक लूकला पसंती, आसनरचनेवर टीका, प्रवाशांत नाराजी

माजी पंतप्रधानांच्या मुलासोबत व्हॉट्सॲपवर सायबर फ्रॉड; 7.8 कोटी रुपये अकाऊंटमधून गायब, अशा परिस्थितीत कसं सुरक्षित राहायचं? पाहा

SCROLL FOR NEXT