मराठवाडा

टोकाई गडावर आता राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर !

मारोती काळे

हे कॅमेरे एका वृक्षप्रेमी नागरिकाने स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहेत.

कुरुंदा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील (wasmat taluka) कुरुंदा (kurunda) येथील टोकाई गड (tokai fort) सर्वदूर परिचित आहे. या गडावर सह्याद्री देवराई वृक्ष मित्रांच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून वृक्षसंवर्धन व जोपासण्याचे कार्य आविरत पणे सुरु आहे. सध्या गडावर विविध माध्यमातून पाच हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. येथे आता सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे एका वृक्षप्रेमी नागरिकाने स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहेत. (A CCTV camera has been installed at tokai fort at kurunda in wasmat taluka)

येथे असलेल्या झाडांना संगोपनाचे कार्य वृक्षप्रेमी करत आहेत, परंतु काही दिवसापुर्वी या गडावर लावलेल्या झाडांना नष्ट करण्याचा प्रयत्न काही समाजविघात नागरीक करण्याचा प्रयत्न करीत आहेत, याला लगाम बसविण्यासाठी सुरक्षचेच्या दृष्टीकोणातून गडावर वृक्ष प्रेमीकडून सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न सुरु होते, या आवहानाला प्रतिसाद देत पांगरा शिंदे येथील रहीवासी संदीप शींदे यांनी स्व खर्चातून गडावर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून ते बसवून दिले आहेत.

शहरात मोठ्या उद्योगात किंवा नोकरीत गावखेड्याची अनेक माणसं मोठी होतात. यातील काहीच माणसं आपल्या गावाबद्दल, परिसराबद्दल शहरात राहून देखील आपुलकी जपतात. आपल्या परिसरात होत असलेल्या कार्यात पांगरा शिंदे येथील संदीप शिंदे यांनी टोकाईगडावर सुरक्षेच्या दृष्टीने चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले, त्या बद्दल सह्याद्री देवराई टोकाईड वृक्षप्रेमी मित्रांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

सहयाद्री देवराई टोकाईगडावर लावण्यात येणारे वृक्ष जगविण्याच्या व समाज विघातक कृत्य करणाऱ्या लोकांपासून वृक्ष वाचविण्याच्या दृष्टीने गडावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अत्यंत आवश्यकता होती. मनिराज सिस्टिम, पुणे चे मालक संदीप शिंदे यांना निसर्गाची आवड असल्याने त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी स्वतःहून स्वखर्चाने सहयाद्री परिवाराला चार सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचे सांगितले व आठ दिवसाच्या आत पुण्याहून स्वतः कॅमेरे येऊन टोकाईगडावर शनिवारी कॅमेरे बसविले या दिवसाची आठवण ठेवण्यासाठी सहपरिवार एक वृक्ष देखील लावण्यात आला आहे.

शहरात राहून देखील आपल्या गावाच्या, परिसरात होणाऱ्या सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे परिसरातील चांगल्या कार्यात सहभागी व्हावं याच उत्तम उदाहरण संदीप शिंदे नक्कीच आहेत. शहरात राहून निसर्गाशी नाळ जपणारे श्री. शिंदे यांच्या सारखी मोठ्या मनाची माणसं सहयाद्री परिवारासोबत या सत्कर्मात सहभागी होतील एवढीच अपेक्षा. यावेळी व्यक्त करण्यात आली तसेच संदीप शिंदे यांचे सहयाद्री देवराई टोकाईगड, आभार व्यक्त करण्यात आले.

(A CCTV camera has been installed at tokai fort at kurunda in wasmat taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT