2Sakal_20News_11 
मराठवाडा

कापसाच्या साठ्याला माजलगावात आग, ‘अग्निशमन’च्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : शहरातील जुना मोंढा भागात असणाऱ्या भैरवनाथ ट्रेडिंग या आडत दुकानात कापुस खरेदी करून साठा करण्यात आला होता. या साठ्याला शनिवारी (ता.१९) संध्याकाळी ६ वाजता अचानक आग लागली. दरम्यान नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी हानी टळली आहे. जुना मोंढा भागातील तुळजाभवानी अर्बनच्या बाजूस विशाल गणेश शिंदे यांचे भैरवनाथ ट्रेडिंग आडत दुकान आहे. या दुकानात खासगी कापूस खरेदी केली जाते. शनिवार संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी असलेल्या कापसाच्या साठ्यातून धूर निघत असल्याचे दिसून आले.

लागलीच आजूबाजूच्या नागरिकांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला याची कल्पना दिली. त्यावेळी तत्परते अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. कापसाने आगीचे रौद्ररूप धारण करण्यापूर्वी आग आटोक्यात आणली. यावेळी दुकानात जवळपास १०० क्विंटलच्या जवळपास कापसाचा साठा होता. यातील २० क्विंटल कापसाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या दुकानाच्या आजूबाजूस धान्याच्या दुकाना होत्या. परंतु सुदैवाने अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात आल्याने मोठी आर्थिकहानी टळली आहे. यावेळी अग्निशमन दलाचे पर्यवेक्षक अनिल भिसे, चालक दत्ता सावंत, रोहित भिसे, जावेद शेख, सय्यद साहिल होते.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT