Beed News
Beed News 
मराठवाडा

देवदर्शनाहून येत होते माघारी, समोर आला सिमेंटचा ट्रक

सकाळ वृत्तसेवा

केज (बीड) : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोचा समोरून येणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन जीपमधून प्रवास करणारे नऊ जण भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात तालुक्यातील गोटेगावजवळ गुरूवारी (ता.२७) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोटेगावजवळ देव दर्शनाहून परत येत असलेल्या बोलेरो जीप (एम एच-३७/जी५०५३) व सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रक (एमएच-१२/एचडी-२२१७) यांच्यात गुरूवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात जीपमधून प्रवास करणारे नऊ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक कोरडे, घोरपडे, मेहेत्रे, खनपटे व ग्रामस्थांच्या सहकार्याने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य चालू  करून जखमींना बाहेर काढले.

वैद्यकीय मदतीसाठी १०८ रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याने कळंब आगाराच्या कळंब-नांदेड या परिवहन महामंडळाच्या बसने जखमींना पोलीस कर्मचारी खनपटे सोबत अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जखमींची नावे मात्र अद्यापही समजू शकली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT