मराठवाडा

बीड - अंबेजोगाई : बस, ट्रकच्या अपघातात ४ ठार, १५ जण जखमी

अंबाजोगाई ते लातूर रस्त्यावरील भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : लातूर रोडवर सायगाव नजीक रविवारी (ता.९) सकाळी आठच्या सुमारास बस व ट्रकची समोरासमोर जोराची धडक होऊन बस मधील चार जण जागीच ठार(bus-truck accident) झाले तर १५ प्रवासी जखमी आहेत. जखमीत ट्रक चालक व क्लिनरचा समावेश आहे.रविवारी सकाळी लातूर -औरंगाबाद (latur - aurangabad bus)ही बस औरंगाबादला निघाली होती. सकाळी वातावरणात धुकेही मोठ्या प्रमाणात होते. आठच्या सुमारास सायगाव नजीक नंदगोपाल डेअरी जवळ ही बस येताच समोरून आलेली ट्रक व बसची समोरासमोर धडक झाली. त्यात चार जण जागीच ठार झाले. ही ट्रकची धडक वाहकाच्या बाजूने झाली, त्यामुळे मृतात वाहकाचाही समावेश आहे. इतर तिन प्रवासी ठार झाले.

अपघातातील मृत

या अपघातात बसचे वाहक चंद्रशेखर मधुकर पाटील (वय ३६) रा. कांचनवाडी औरंगाबाद, प्रवासी आदील सलीम शेख (वय २९) रा.अंबाजोगाई, नलिनी मधुकरराव देशमुख (वय ७२) रा. ज्योती नगर औरंगाबाद व इतर अनोळखी एक असे चार जण ठार झाले.

अपघातील जखमी

जखमींवर येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींची नावे पुढील प्रमाणे : सुंदरराव ज्ञानोबा थोरात (वय ५०) रा. पांगरी (ता.केज), हरिनाथ रघुनाथ चव्हाण (वय ६७), असमत फहीम पठाण (वय ३८), जियान फहीम पठाण (वय १०), भागवत निवृत्ती कांबळे (वय ५५), योगिता भागवत कदम (वय ४०), संगीता बजरंग जोगदंड (वय ४४), अय्यान फहीम पठाण (वय १३) हे सर्व रा. लातूर, अल्लाउद्दीन अमीर पठाण (वय २०), दस्तगीर अय्युब पठाण (वय १९) हे दोघे रा.निलंगा, प्रकाश जनार्दन ठाकुर (वय ५५) रा. शेंदी, सुभाष भागवत गायकवाड (वय ४३) रा. पिंपळगाव, माधव नरसिंगराव पठारे (वय ६५) रा. जालना, बळीराम संभाजी कराड (वय २२) रा. खोडवा सावरगाव हे १४ जण जखमी झाले आहेत. या जखमीत ट्रक चालक व क्लिनरचा समावेश आहे.

बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी पोचून क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवले. या अपघातातील मृत्यू पावलेल्या एकाची अद्याप ओळख पटलेली नाही.

अरुंद रस्तामुळे अपघात

बर्दापूर ते सेलूअंबा या लातूर रस्त्यावर नेहमीच अपघात होतात. रविवारी सकाळी धुकेही होते, रस्ताही नव्याने बांधला असला तरी तो अरूंद आहे. राष्ट्रीय महामार्ग असूनही बर्दापूर पासून पुढे हा सिमेंट रस्ता दोन पदरीच बांधण्यात आला आहे. त्यामुळे अरुंद रस्ता आणि धुके हेही या अपघाताचे कारण ठरते. बस वाहकाच्या बाजूने ट्रकची धडक झाल्याने धुक्यामुळे ट्रक चालकाला दिसले नसावे असाही अंदाज व्यक्त होत आहे.

मदतीला नागरिकही धावले

या अपघाताची माहिती जवळच असलेल्या सायगावच्या स्थानकावर कळताच तेथील नागरीक मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. ट्रक चालकही अडकला होता. त्यालाही बाहेर काढण्यात नागरिकांनी पोलिसांना मदत करण्यात पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT