Hingoli Crime News esakal
मराठवाडा

Hingoli : हिंगोलीत सशस्त्र दरोडा,पोलिसांनी केले आरोपींना जेरबंद

भरदिवसा हिंगोलीत दरोडा टाकणारे दोन दरोडेखोर अखेर पोलिसांनी पकडले.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली शहरातील बियाणीनगर येथे दिवसा टाकलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून त्यांच्याकडुन दोन पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असल्याची माहिती गुरुवारी (ता.१३) स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली. हिंगोली (Hingoli) शहरातील बियाणीनगर भागात ३० डिसेंबर रोजी अंजली अविनाश कल्याणकर या घरात एकट्या असताना त्यांचे रूममध्ये दोन अनोळखी व्यक्तीने अचानक त्याच्या हातामध्ये पिस्तूल घेऊन घरात घुसले व सदर महिलेचे व त्यांच्या लहान मुलांचे हातपाय बांधुन, महिलेच्या हातावर चाकूने (Hingoli Crime Update) वार करून महिलेस गंभीर जखमी केले. त्यांच्याकडून, सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटुन नेल्याने शहरात एकच खळबळ उडुन भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना तपासावर विशेष लक्ष देण्याचे निर्दोष देऊन, पोलीस उपनिरीक्षक उदय खंडेराय यांना गुन्हा उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. (Accused Arrested In Hingoli Robbery Case)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक नेमण्यात आले. या पथकाला माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी चंद्रकांत काकडे (रा.मानकेश्वर, ता.जिंतुर,जि.परभणी), नचिकेत वाघमारे (रा.भोईपुरा, हिंगोली) यांनी केला आहे. त्यापैकी एक आरोपी फरार आहे, अशी माहिती मिळाल्यावरून पथकाने आरोपी चंद्रकांत काकडे यास हिंगोलीमधून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की मी एक्सप्रेस बी या पार्सल कंपनीचा कर्मचारी असुन पार्सल देण्याच्या अनुषंगाने बियाणीनगर येथील फिर्यादी अंजली कल्याणकर यांचे घरी नेहमी जात होतो. घरामध्ये श्रीमती कल्याणकर व त्यांचे छोटे मुले राहतात याबाबत माहिती घेऊन सदरची माहिती मित्र नचिकेत वाघमारे यास सांगुन पिस्तूलच्या धाकावर भरदिवसा दरोडा टाकण्याची योजना आखली. त्या अनुषंगाने ३० डिसेंबर रोजी चंद्रकांत काकडे व नचिकेत वाघमारे यांनी दोन पिस्तूल, चाकु घेऊन महिलेच्या घरात भरदिवसा घुसले व फिर्यादीचे तोंड दाबुन पिस्तूलचा धाक दाखवुन व हातावर वार करून रोख रक्कम व सोने असा दोन लाख ८६ हजाराचा मुद्देमाल लुटुन नेल्याचे सांगुन दुसरा आरोपी नचिकेत हा मध्य प्रदेशमध्ये पळुन गेल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने पोलीस पथकाने आरोपीच्या मागावर मध्य प्रदेश , मुंबई , पुणे असा पाठलाग करून दुसरा आरोपी नचिकेत वाघमारे यास पकडले.

दोन्ही आरोपीकडुन गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल एक जिवंत काडतुस व गुन्ह्यात गेलेले सर्व सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेले मोटारसायकल व मोबाईल असा एकुण चार लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख , पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे, उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे भाग्यश्री कांबळे, पोलीस अमंलदार भगवान आडे, नितीन गोरे,किशोर कातकडे, ज्ञानेश्वर सावळे, विठ्ठल काळे, शेख जावेद, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघण, सुमित टाले, इरफान पठाण, जयप्रकाश झाडे यांच्या पथकाने केली. यापूर्वी सुध्दा सुराणा नगर येथे शसस्त्र दरोडा पडला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अवघ्या ४८ तासात दरोड्याचा छडा लावला होता.

त्यानंतर बियाणी नगर येथील सशस्त्र दरोड्याचा छडा सुध्दा स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीने लावला असुन , गंभीर गुन्हे कोणत्याही परिस्थितीत तात्काळ उघड करून हिंगोली पोलीस हे सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सदर गुन्हा उघडकीस आल्यामुळे बियाणी नगरसह पूर्ण हिंगोली शहरात समाधानाचे वातावरण आहे. तसेच पोलीसांतर्फे आवाहन करण्यात येते की कोणत्याही पार्सलबॉयला पूर्ण दरवाजापर्यंत येऊ देऊ नये. तसेच खासगी माहिती सांगु नये. तसेच गल्लीत, कॉलनीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची खात्री करावी. तसे शक्य असल्यास आपल्या घरासमोर , दुकानासमोर , गल्लीत चांगल्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत शक्य असल्यास खात्रीलायक चौकीदार नेमावेत. पोलीसांना सहकार्य करावे. हिंगोली पोलीस आपल्या मदतीसाठी २४ तास तत्पर आहे असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT