file photo
file photo 
मराठवाडा

दरोड्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका टोलनाक्यावर दरोडा टाकून पसार झालेल्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता.25) दुपारी अटक केली. 

नांदेडच्या अबचलनगर परिसरात राहणारा गुन्हेगार जसपालसिंग गुरूचरणसिंग संधु याने आपल्या काही साथीदारांसह कुंटूर (ता.नायगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदेड - नायगाव रस्त्यावरील टोलनाका येथे 2019 मध्ये दरोडा टाकला होता. त्या प्रकरणातील काही जणांना पोलिसांनी अटक केली, मात्र जसपालसिंग संधु हा तेंव्हापासून फरार होता. शहर व जिल्ह्यातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची (ता.22) जानेवारीला स्थापना केली. 

पथकप्रमुख ज्ञानोबा देवकते यांना शहरात गस्त घालताना मिळालेल्या माहितीवरून अबचलनगर भागातून जसपालसिंग संधु याला शनिवारी दुपारी अटक केली. त्याला तपासासाठी कुंटुर पोलिसांच्या स्वाधीन केले. यासाठी फौजदार दशरथ आडे, श्री. करले, जसपालसिंग कालो, देवा चव्हाण, किशन मुळे, राज ठाकरे, श्रीराम दासरे, इसराईल शेख, संतोष शिंदे यांनी परिश्रम घेतले. 

बाभूळगाव स्‍त्‍यावर आढळले अर्धवट जळालेले प्रेत

वसमत : वसमत तालुक्यातील बाभूळगाव शिवारात एका शेताच्या कडेला शुक्रवारी (ता.24) सकाळी नऊ वाजता अनोळखी व्यक्तीचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिस तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, वसमत तालुक्यातील बाभूळगाव जवळ रस्त्याच्या कडेला एका नाल्यात अनोळखी व्यक्तीचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. याची माहिती वसमत ग्रामीणचे पोलिस निरीक्षक बी. आर. बंदखडके यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता वसमत रुग्णालयात पाठविण्यात आला. या बाबत आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक बी.आर. बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

वरद कुलकर्णी महाराष्ट्र क्रिकेट संघात

परभणी : परभणीचा उदयोन्मुख जलद गोलंदाज वरद कुलकर्णी यांची 14 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. वरद याने नुकत्याच पूणे येथे झालेल्या 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली होती. 14 वर्षाखालील आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा पुणे येथे संपन्न होत आहे. वरद यांची संघात निवड झाल्याबद्दल परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोबडे, उपाध्यक्ष जवळेकर, सचिव प्रा. डॉ. सुरेश सोनी, अ‍ॅड. स. अब्दुला, ज्ञानेश्‍वर काकडे, इर्शाद भाई, संघाचे मुख्य प्रशिक्षक सुहास पावडे, सुरेश काकडे यांनी कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT