file photo 
मराठवाडा

खासगी रुग्णालय बंद ठेवल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा

परभणी : कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत खासगी डॉक्टर्स जर सेवा देत नसतील तर ही त्यांच्या व्यावसायाची प्रतारणा आहे. त्या सर्वांना आपले बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु तरी देखील त्यांनी ते सुरु न केल्यास परवाने निलंबीत करण्याची कार्यवाही करावी लागेल असा इशारा देत शासकीय योजनेतील अन्नधान्य लाभर्थ्यांना घरपोच देणार असल्याची माहिती दिली. 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत एका बैठकीत, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात कोरोनाची स्थिती, वैद्यकीय सुविधांबाबत माहिती दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयात अर्धा किलोमिटरच्या रांगा लागत आहेत. ही परिस्थिती खासगी वैद्यकीय सेवा बंद असल्यामुळेच आहे. त्यांच्याशी चर्चा केली आहे. आपले दवाखाने सुरु करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. जर झाली नाहीत तर नाविलाजाने परवाने निलंबनाची कार्यवाही करावी लागेल, असा इशारा देखील श्री. मुगळीकर यांनी या वेळी दिला. 

लाभार्थींना घरपोच धान्याचा पुरवठा
केंद्र व राज्य शासनाकडून अन्नसुरक्षा योजना, अत्यंदोय योजनेसह अन्य काही योजनेतून अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो. तीन महिण्याचा साठा देण्याचे शासनाचे निर्देश असून  लाभार्थ्यांना हे अन्नधान्य घरपोच दिले जाणार आहे. त्यासाठी एनजीओची मदत घेतली जाणार असल्याचे देखील ते म्हणाले. जिल्ह्यात कामधंदा नसललेले, पैसे नसलेले असे जवळपास २० टक्के लोक असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यासाठी या योजनेतून अन्नधान्याचा पुरवठा होऊ शकत नाही. अशांसाठी काय करावे, याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. परंतु सद्यस्थितीत अशांसाठी मदत कक्ष सुरु केला आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. 

परदेशातून आलेल्यांची माहिती द्यावी
जगातील बारा देशातून आलेल्या नागरीकांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश आहेत. शहरात देखील असे जवळपास ६० नागरीक आले आहेत. तर एक जन स्पेनहून आला होता. त्यांनी ही माहिती दिली नाही. परंतु माहिती मिळताच, प्रशासनाने त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले आहे. जनतेने देखील आपल्या आजूबाजूस असे कुणी आढळून असल्यास माहिती द्यावीच परंतु त्यांनी सुध्दा आल्याची माहिती देऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन श्री. मुगळीकर यांनी केले. 

जिल्हा रुग्णालयात १०० बेडची व्यवस्था
शासनाने जिल्हा रुग्णालयात १०० बेडचा कोरोना कक्ष उघडण्याचे आदेश दिले आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात ४० बेड तर डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या सरस्वती धन्वतंरी रुग्णालयात ३० बेडची व्यवस्था आहे. जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागासह अन्य एका इमारतीत आसोलेशन वार्ड निर्माण केले जात असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात १३० संशयीत रुग्ण झाले असून त्यापैकी ५५ जनांचे स्वॅब निगेटीव्ह आले. ११ जणांचे अहवाल प्रलंबीत आहेत तर १५ जणांचे नाकारण्यात आल्याची माहिती श्री. मुगळीकर यांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT