ahmadpur bajar samiti.jpg 
मराठवाडा

अहमदपूर बाजार समितीच्या प्रशासक मंडळाची नियुक्ती, सभापतीपदी हेंगणे 

रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (लातूर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची गुरुवारी (ता.३) लातूर येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळात एकूण सोळा सदस्यांचा समावेश असून सभापतीपदी शिवानंद हेंगणे यांची नियुक्ती झाली आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल ८ सप्टेंबर २०१६ ला संपुष्टात आला होता. ठराविक कालावधीत समितीने निवडणूका घेणे अपेक्षित होते. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक सक्षम नसल्याने निवडणूक झाली नाही. शासनाच्या वतीने सहायक निबंधकांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. दरम्यान शासन बदलीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक झाल्या नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत वर नव्याने प्रशासक नियुक्ती चालू करण्यात आली. या संदर्भात आमदार बाबासाहेब पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना तर पालक मंत्री अमित देशमुख यांनी पणन मंत्र्यांना पत्राद्वारे कळवल्यानंतर संबधित कार्यालयातून जिल्हा उपनिबंधक कार्यालयास संचालक निवडीबद्दल कळवले व ही निवड झाली.

कार्यकारिणीत यांचा समावेश 
अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९६० ला झाली असून १५ एकर जागेत असलेल्या या बाजार समितीत ८० आडत दुकानं, शेतकरी व हमाल निवास असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर सोळा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभापतीपदी शिवानंद हेंगणे तर संचालक म्हणून तुकाराम पाटील, दिलीप जाधव, ॲड.हेमंत पाटील, विकास महाजन, बालाजी रेड्डी, उत्तम माने, अनिल मेनकुदळे, सुंदर साखरे, सुभाष मुंडे, बाबूराव सारोळे, भारत सांगवीकर, सिराज जहागीरदार, शाम देवकते, माऊली देवकते, सय्यद सलीम अब्दुल हमीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(संपादक-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT