Osmanabad News 
मराठवाडा

साहित्य संमेलनाच्या जागृतीसाठी निघणार साहित्य ज्योत

राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : उस्मानाबादेत 10 जानेवारीपासून होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जागर करण्यासाठी जिल्हाभरात शुक्रवारी (ता. तीन) आणि शनिवारी (ता. चार) साहित्यज्योत काढण्यात येणार आहे. या साहित्यज्योतीच्या अग्रभागी चित्ररथ असणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून साहित्यज्योत घेऊन जागर केला जाणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे, प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर यांनी दिली.

उस्मानाबाद येथे 10 ते 12 जानेवारी या कालावधीत 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची जिल्हाभरातील नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी साहित्यज्योत काढण्यात येणार आहे. त्याची माहिती श्री. तावडे, श्री. केसकर यांनी बुधवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...
 
अचलबेट (ता. उमरगा) येथून शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता साहित्यज्योतीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. उमरगा, लोहारामार्गे दुपारी साडेबारा वाजता ही ज्योत तुळजापूर येथे दाखल होईल. तेथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन या ज्योतीचे येडशीकडे प्रस्थान होईल. कसबेतडवळे, ढोकी, गोविंदपूर, भाटशिरपुरा, डिकसळमार्गे कळंब शहरात सायंकाळी सव्वासहा वाजता आगमन होईल. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कळंब शहरातून फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर ही ज्योत कळंब येथे मुक्कामी असेल. 

शनिवारी सकाळी कळंब शहरातून या ज्योतीचे इटकूरकडे प्रस्थान होईल. सकाळी साडेनऊ वाजता वाशी येथे आगमन होईल. त्यानंतर भूममार्गे सोनारी (ता. परंडा) येथे दुपारी एक वाजता ज्योतीचे आगमन झाल्यानंतर तेथे काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन परंडा शहराकडे प्रस्थान होईल. दुपारी तीन वाजता परंडा येथून निघून बार्शी शहराकडे प्रस्थान होईल. 

उस्मानाबाद शहरात फेरी

बार्शीहून निघून सायंकाळी साडेचार वाजता उस्मानाबाद येथील राजमाता जिजाऊ चौकात या ज्योतीचे आगमन होईल. त्यानंतर उस्मानाबाद शहरात फेरी काढून संमेलनाचा जागर करण्यात येईल. सायंकाळी संमेलनाच्या कार्यक्रमस्थळी या ज्योतीची स्थापना करण्यात येणार आहे. यासोबत जवळपास 40 वाहनांचा ताफा राहणार आहे. 

ठिकठिकाणी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थांनी या ज्योतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्योतीसमवेत असलेल्या चित्ररथामध्ये संमेलनाची माहिती असेल, असे श्री. तावडे, श्री. केसकर यांनी सांगितले.

यावेळी कोषाध्यक्ष माधव इंगळे, उपाध्यक्ष डॉ. जयसिंगराव देशमुख, डॉ. अभय शहापूरकर, प्रशांत पाटील, राजेंद्र अत्रे, बालाजी तांबे, आशीष मोदाणी, संजय मंत्री, अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : धामणगाव येथे नदीच्या पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT