Aurangabad news  
मराठवाडा

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर

आशिष तागडे

संत गोरोबाकाका नगरी (उस्मानाबाद) : धर्म आणि साहित्य हे दोन वेगवेगळे विषय आहेत या दोन्ही विषयांची एकमेकांत मिसळून गल्लत करू नका. आपल्याला धार्मिक आणि साहित्यिक परंपरा आहेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना. धो. महानोर यांनी 'सकाळशी' बोलताना व्यक्त केले.

उस्मानाबाद येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक, प्रख्यात कवी, पद्मश्री ना. धों. महानोर यांना "साहित्य संमेलनाला जाऊ नका' असे फोन आले होते. वेगवेगळ्या लोकांनी, ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी रोज फोन करून संमेलनाला न जाण्याच्या सूचना केल्या होत्या. ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे तुम्ही उद्‌घाटक होऊ नका, असे सांगणारे फोन सातत्याने येत असल्याचे ना. धों. महानोर यांचे नातू शशिकांत महानोर यांनी "सकाळ'ला सांगितले होते. मात्र असे फोन आले तरीही महानोर उद्‌घाटक म्हणून संमेलनाला हजर राहिले आहेत. 

महानोर म्हणाले सगळ्यांना सामावून घेणारा व समृद्ध असा धर्म आणला पाहिजे. धर्म हा माणसाच्या उद्धारासाठी असतो. त्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. आपल्याकडे संविधानानुसार सगळ्यांना स्वतंत्र मत मांडण्याचा सर्व जाती धर्मानं मत मांडण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.  

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि साहित्य संमेलन संदर्भात ते म्हणाले, की गेल्या 35 वर्षांपासून या विषयावर बोलत आहोत. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने पाणी निर्माण करून दिले पाहिजे. त्यासाठी पाणी आयोगाची निर्मिती केली आहे कर्जमाफी ही तात्पुरती असून त्यांने कायमस्वरूपी प्रश्न सुटणार नाही कायमस्वरूपी प्रश्न सुटण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने पाणी देण्याची गरज आहे. वाचनाअभावी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आपण पुरेशा गांभीर्याने कोणतेच वाचन करत नाही, अशी खंतही महानोर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur BJP Leader Poison : भाजप पदाधिकाऱ्याने घेतल विष, धक्कादायक कारण समोर; सर्वसामान्यांना २४ टक्के व्याजदराचे आमिष दाखवलं अन्..

Pune Leopard Rescue: ८ महिन्यांचा पाठलाग, ३० जणांचे पथक, ८० फूट बोगदा… पुणे विमानतळावर बिबट्या मोहिमेचा सिनेमॅटिक क्लायमॅक्स!

Viral Video: मरता मरता वाचला भाऊ ...! स्कायडायव्हिंग करताना पॅराशूट विमानाच्या पंख्यात अडकलं अन् पुढं काय झालं पाहा Video

तुमचा फोटोही सेलिब्रिटीसारखा दिसेल! अक्षय खन्ना लूकसाठी टॉप 5 AI Prompts

'आमचं प्रेम खरं होतं' धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी रडल्या, म्हणाल्या...'त्याचं 'ते' स्वप्न अपूर्णच राहिलं'

SCROLL FOR NEXT