photo 
मराठवाडा

बाराशिव हनुमान यात्रोत्सवाची जय्यत तयारी

विठ्ठल कदम

करंजाळा(जि. हिंगोली): बाराशिव (ता. वसमत) येथे हिंगोली ते परभणी राज्य मार्गावर असललेल्या हनुमानाचे मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. रविवार (ता. नऊ) पासून यात्रा महोत्‍सवास सुरवात होणार आहे. यानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. परजिल्ह्यांतून येणाऱ्या भाविकांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

वसमत तालुक्‍यातील कंरजाळा ग्रामपंचायतींतर्गत येत असलेले बाराशिव हनुमाचे मंदिर बारा गावांच्या शिवेवर आहे. त्यामुळे या मंदिरास बाराशिव असे नाव देण्यात आले आहे. या मंदिराला करंजाळा, बोरी सावंत, गुंडा, रांजाळा, आजरसोंडा, जवळा बाजार, करंजी, विरेगाव, परळी, कळंबा, तपोवन, आडगाव या गावांच्या शिव लागून आहेत. हिंगोली ते परभणी राज्य मार्गावर हे मंदिर असल्याने भाविकांची येथे दररोज गर्दी असते. वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. 

दर्शनासाठी भाविकांच्या रांगा 

श्रावणातील प्रत्येक शनिवारी येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. या मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत शासनाने समावेश केला आहे. येथे विद्युतीकरण, भक्‍तनिवास, सांस्‍कृतिक सभागृह, पिण्याचे शुद्ध पाणी आदी सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाराशिव हनुमान वार्षिक यात्रा महोत्‍सवाची सुरवात रविवारपासून (ता. नऊ) होणार आहे. यानिमित्त पहाटे चार वाजता खासदार हेमंत पाटील यांच्‍या हस्‍ते महापूजा होणार आहे. त्‍यानंतर ध्वजवंदन आणि गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. 

कापूर जाळण्याचा कार्यक्रम

रात्री साडेआठ वाजता पावडेवाडीकर यांचा कापूर जाळण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री साडेआठ वाजता अच्युत महाराज दस्‍तापूरकर यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी (ता. दहा) सकाळी अकरा वाजता कुस्‍त्‍यांची दंगल आयोजित केली आहे. उद्‌घाटन माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, परभणीचे खासदार बंडू जाधव, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, सरपंच बालासाहेब गरुड, जिल्‍हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष अंबादासराव भोसले यांच्या हस्‍ते होईल. 

मान्यवरांची राहणार उपस्थिती

या वेळी आमदार राहुल पाटील, सतीश जाधव, मारोतराव बनसोडे, रामकिशन राखोडे, बाबूराव कदम, बालासाहेब कावळे, सुंदरराव कुऱ्हे, शिवाजी भालेराव, शंकरराव आहेर आदी उपस्‍थित राहणार आहेत. त्‍यानंतर बक्षीस वितरण केले जाणार असून या वेळी आमदार संतोष बांगर, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, युवा सेना जिल्‍हाप्रमुख बाजीराव सवंडकर, बालाजी ताभांळे, सुनील काळे, संभाजी बेले, व्यंकटराव शिंदे, रामभाऊ कदम यांची उपस्‍थिती राहणार आहे.

कृषी मेळावा, कृषी प्रदर्शनाचा समावेश

मंगळवारी (ता. ११) कृषी मेळावा, कृषी प्रदर्शन, पशू मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्‌घाटन आमदार राजू नवघरे यांच्‍या हस्‍ते होईल. या वेळी जिल्‍हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, गटनेते अंकुश आहेर, तुकाराम गरुड, सभापती रूपाली पाटील गोरेगावकर, फकिरा मुंढे, बाजीराव जुमडे, सरपंच सागरबाई वाघमारे, ज्ञानेश्वर पाटील, मधुकर वाघमारे, उज्‍ज्वला तांबाळे, गोपाल अग्रवाल, लक्ष्मण डफडे, जीवनलता परिहार यांची उपस्‍थिती राहणार आहे.

बक्षीसांची लयलूट

बुधवारी (ता. १२) पशू प्रदर्शनाचे उद्‌घाटन सकाळी अकरा वाजता कृषी सभापती रत्‍नमाला चव्हाण, सभापती ज्‍योती धोसे, उपसभापती विजय नरवाडे, माजी सभापती चंद्रकांत दळवी, पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ क्षीरसागर, ज्ञानेश्वर झटे, कैलासराव कदम यांच्या हस्‍ते होणार आहे. बक्षीस वितरण आमदार तान्हाजी मुटकुळे, ॲड. शिवाजीराव जाधव, मुरलीधर मुळे, गंगाराम कदम, मुंजाजी कदम आदींच्या उपस्‍थितीत होणार आहे. बक्षीस वितरण आमदार राहुल पाटील, डॉ. अमोल भालेराव, कृषी अधिकारी बालासाहेब कदम, विठ्ठल सुरोशे यांच्या हस्ते होणार आहे. 

दुकाने उभारण्याची तयारी

या वेळी उद्धव सावंत, सखाराम डोळस, रविराज देशमुख, नारायण चव्हाण, प्रकाश चव्हाण आदी मान्यवर उपस्‍थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्‍थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय, करंजाळा, बाराशिव संस्‍थान व गावकरी मंडळीतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, यात्रा महोत्सवानिमित्त हॉटेल, प्रसादालये, बेलफूल, धार्मिक साहित्य, भांडे, कपडे विक्रीची दुकाने थाटण्यात आली असून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT