Beed Police News 
मराठवाडा

लाच घेताना शिरुरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले

चंद्रकांत राजहंस

शिरुर कासार : अवैध दारु विक्री करु द्यावी आणि चॅप्टर केसमध्ये जामीन मिळावा, म्हणून लाच घेताना तिघे पडकल्याच्या घटनेला महिनाही उलटत नाही तोच पुन्हा येथे सहाय्यक निबंधक कार्यालयात लाच घेताना मंगळवारी (ता. १०) तिघे जाळ्यात अडकले. महिनाभरातील दोन घटनांवरुन तालुक्यातील शासकीय यंत्रणेत सुरु असलेली लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

सहाय्यक निबंधक संजय कारभारी सोनवणे, मुख्य लिपीक तुकाराम कोंडीबा वायबसे, लेखा परीक्षक पद्माकर अवधूत कुलकर्णी अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराविरुद्ध सहाय्यक निबंधक कार्यालयात सुरु असलेल्या चौकशीचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी लाच मागीतल्याची तक्रार होती. यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

यावेळी आठ हजारांची लाच स्विकारताना तिघे जाळ्यात अडकले. दरम्यान, पंधरवाड्यापूर्वीच येथील तिन पोलिसांना एकाच वेळी लाच घेताना पकडण्यात आले होते. पुन्हा एकदा असेच तिघे अडकले आहेत. या दोन घटनांनी तालुक्यातील शासकीय कार्यालयांतील लाचखोरी समोर आली आहे. या कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील, अमोल बागलाने, प्रदीप वीर यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT