korona 
मराठवाडा

चिंता वाढली : हिंगोलीत आणखी एक जवान निघाला कोरोनाबाधित

राजेश दारव्हेकर

हिंगोली : मालेगाव येथील बंदोबस्तावरून परतलेला जालना येथील एसआरपीएफचा २७ वर्षीय जवान कोरोनाबाधित असल्याचे शनिवारी (ता.२५) समोर आले आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चांगली आहे. दरम्यान, हा जवान आपल्या मुळ गावी हिवरा बेल (ता. हिंगोली) येथे आला होता. प्रशासनाला ही माहिती मिळाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. 

हिंगोली येथील राज्य राखील दलातील १८३ जवान मालेगाव व मुंबई येथे बंदोबस्तासाठी गेले होते. बंदोबस्तानंतर हे जवान हिंगोलीकडे परतले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या जवानांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी यातील सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

हिवरा बेल येथील रहिवासी

दरम्यान, हिंगोलीसह जालना येथील राज्य राखीव दलाचे जवानही मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. ते जवानही परत आले असून त्यातील एक जवान हिवरा बेल (ता. हिंगोली) येथील रहिवासी आहे. तो जवान हिवरा बेल येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. 

जवानाची प्रकृती स्थिर

त्याच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. शनिवारी त्याच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले. जवानाची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. 

कोरोनाबाधितांची संख्या सातवर पोचली

परंतु, प्रशासनाने कोरोना बाधित जवानाच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांनाही रुग्णालयात क्वारंटाइन केले आहे. जिल्ह्यात आढळलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतला असतानाच पुन्हा सहा जवान कोरोना बाधित आढळले. आता त्यात आणखी एका जवानाची भर पडली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातवर पोचली आहे. दरम्यान, प्रशासनाने हिवरा बेल गाव सील केले असून पोलिस प्रशासनासह आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.     

हिंगोलीतील जवानांशी आला होता संपर्क

दरम्यान, हिंगोलीतील राज्य राखीव दलातील कोरोनाबाधित जवानांसोबत जालना येथील जवानही बंदोबस्तासाठी मालेगाव येथे गेले होते. या वेळी हिंगोलीत कोरोनाबाधित आढळलेल्या जवानांच्या संपर्कात या जवानाचा संपर्क आला होता. आता हिंगोलीकरांची चिंता वाढली असून कोरोनाबाधित जवानांच्या संपर्कात आढळलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांना कॉरंटाइन केले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

IND VS SL 2ND TEST : हाताला पट्टी, मनात जिद्द! Rishabh Pant ला मैदानावर पाहून श्रीलंकन थरथरले; त्यात थोडक्यात विकेट हुकल्याने आणखी घाबरले Video

Mumbai: मुंबईत गणरायाच्या आगमनात संतापजनक प्रकार! मिरवणुकीत इमारतीवरून अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणावाचे वातावरण

Marathi News Live Updates : वैजापुरात कचोरीत उंदराची विष्ठा आढळल्याने खळबळ

ST Bus : सहली, लग्नसोहळे, यात्रांचा प्रवास महागला! एसटीच्या प्रासंगिक करार भाड्यात ११ ते १९ रुपयांनी वाढ

SCROLL FOR NEXT