file photo 
मराठवाडा

Video : हंगेरीतून तरुणाचे भारतीयांना कळकळीचे आवाहन...

जगदिश जोगदंड

पूर्णा (जि.परभणी) : पूर्णा  येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेतलेले व सध्या इटालीच्या बाजूस असलेल्या हंगेरी देशात राहणारे अय्याज बी. जी. शेख यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून ‘सकाळ’ शी संवाद साधत कोरोनाबाबत भारतीयांना कळकळीचे आवाहन केले.

हेही वाचा - मराठवाडा पुन्हा संकटात; वादळी वाऱ्यासह गारपीट होणार
 या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाचे कौतुक करून ढील न देता कर्फ्यू अतिशय कडक करण्याची गरज व्यक्त केली. 
या वेळी अय्याज शेख म्हणाले...

जय हिंद दोस्तहो ....
जगातील एकूणच मानव जातीवर आलेल्या या संकटाबाबतीत भारतीय माणूस व्हावा तेव्हढा गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र पहावयास मिळत आहे. ही बेफिकरी मोठे नुकसान करू शकते. म्हणून भारतीय बंधू भगिनींनो गांभीर्याने वागत काळजी घ्या.
हे संकट किती मोठे आहे याची तुम्ही गांभीर्यपूर्वक घेतले नाही. हे वर्तनातून दिसून येत आहे. तुमच्या हुल्लडबाजीच्या बेशिस्त वागण्याने केवळ तुम्हीच नाही तर तुमचे कुटुंब व राष्ट्र संकटात सापडेल. भारतात आठ दिवस कडक संचारबंदी (कर्फ्यू) लावण्याची गरज आहे. घरात जे असेल त्यावर धकवा. पण घराबाहेर निघू नका.

हेही वाचा - केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे :  आमदार राहुल पाटील

पोलिसांच्या भुमिकेचे कौतुक
दरम्यान, जिवनावश्यक वस्तूंची खरेदीच्या नावाखाली बिनकामाची टवाळकी करत हौसे खातर फिरणाऱ्याचीच मोठी गर्दी पूर्णा शहरात पहावयास मिळाली. पोलिसांच्या लाठीचा प्रसाद दिला. सोशल मिडियातून पोलिसांच्या कणखर भुमिकेचे कौतुक करण्यात आले. अशा पद्धतीने फिरणाऱ्याना गाढव, जनावरे, कुत्रे अशा उपमा नेटकऱ्यांनी वापरल्या तरीही फिरणाऱ्याचे प्रमाण कमी मात्र झालेले नाही. सरकार व आरोग्य यंत्रणा सातत्याने अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहे. 

हेही वाचा व पहा - Video: गांभीर्य नसणाऱ्यांना मिळाला काठीचा प्रसाद

बाजारपेठेत बेशिस्तीचे वर्तन
दरम्यान, कर्फ्यू आहे परंतु त्याचे काहीही गांभीर्य जनतेला नसल्याचे दुर्दैवी चित्र मंगळवारी (ता.२४) पूर्णा येथील बाजारपेठेत पहावयास मिळाले. ठरवून दिलेल्या वेळेत किराणा सामान, फळ, भाजीपाला यांची दुकाने उघडी होती. परंतु खरेदी करणाऱ्यापेक्षा गंम्मत म्हणून फिरणारेच बाजारपेठेत जास्त दिसले त्यात तरूण व शिकलेल्यांचा मोठ्यासंख्येने समावेश होता.
 ही बाब गांभीर्य नसल्याचे द्योतक आहे. अनेक रिकाम टेकडे तर चौकाचौकात, कॉलनीत व बंद दुकानांच्या पायऱ्यावर चकाट्या पिटत बसल्याचे दिसून येत होते. त्यात पूणे, मुंबई आदी ठिकाणाहून आलेलेही मोठ्यासंख्येने सहभागी होते. अनेकजण दुचाकीवर तिघे तिघे बसून सुसाट वेगाने फिरत होते. अशा बेशिस्त वर्तनाचे काय परिणाम होवू शकतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

Physics NEET Paper Leak Case : नीट फिजीक्सचा पेपर फोडणाऱ्या महिलेचे नाव समोर, सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; तीसरी पण 'मनिषा'च शोधली

SCROLL FOR NEXT