file photo 
मराठवाडा

चार पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकामास मंजुरी

कैलास चव्हाण

परभणी : जिल्हा स्थायी समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील दीड कोटी रुपयांच्या चार पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकामासह ग्रामीण भागातील सात जोडरस्त्यासदेखील मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या कै. बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहात अध्यक्षा श्रीमती निर्मला विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची पहिली बैठक सोमवारी (ता. १७) दुपारी तीन वाजता पार पडली. या वेळी उपाध्यक्ष अजय चौधरी, शिक्षण सभापती अंजली आनेराव, महिला व बालकल्याण सभापती शोभा घाटगे, कृषी सभापती मीरा टेंगसे, समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहापुढे आले होते.

त्यामध्ये राणीसावरगाव (ता.गंगाखेड), बोरी (ता. जिंतूर), चारठाणा (ता. जिंतूर) येथील प्रत्येकी ४० लाख रुपये किमतीचा आणि वाघाळा (ता. पाथरी) येथील ३० लाख रुपये किंमतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला. या एकूण एक कोटी ५० लाख रुपयांच्या प्रस्तावांना सभागृहाने मान्यता दिला. तसेच देवसडी ते आडगाव (ता. जिंतूर) हा रस्ता सुधारणा व पूल बांधकाम करणे, वझर खोरवड (ता. जिंतूर) येथील रस्ता बांधकाम व पूलमोऱ्या बांधकाम करणे, राज्य मार्ग २४८ ते टाकळी कुंभकर्ण (ता. परभणी) येथील सिमेंट रस्ता व पेव्हरब्लॉक करणे, राज्य मार्ग २४८ ते पांगरी (ता. जिंतूर) रस्त्याची सुधारणा करणे, पेव्हरब्लॉक करणे, राज्य मार्ग ६१ पासून २३५ ला मिळणारा रस्ता सुधारणा करणे, सिमेंट रस्त्यासह पूलमोऱ्या बांधकाम करणे, पूर्णा आबादी जोडरस्ता ते कानडखेड रस्ता सुधारणा करणे, अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांची शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

हेही वाचा - पेरुने दिला ‘या’ शेतकऱ्याला बक्कळ पैसा !


ताडबोरगाव शाळेच्या बांधकामास मंजुरी
ताडबोरगाव (ता. मानवत) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सहा नवीन खोली बांधकामास मंजुरी देण्यात आली. ३७ लाख २३ हजार ८९९ रुपयांचे काम असून आर. एन. तारे कंत्राटदार यांना हे काम देण्यास मान्यता देण्यात आली.
 

...ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची चौकशी करा
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील महिला व युवतींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद असून प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीची चौकशी करण्याची मागणी सदस्य विष्णू मांडे यांनी सभागृहात केली. संबंधित एजन्सीकडे कोणता अनुभव आहे, प्रशिक्षण कुठे दिले जात आहे, याची माहिती सादर करण्याची सूचना मांडे यांनी मांडली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT