Nanded Photo
Nanded Photo 
मराठवाडा

पोलिसांच्या मनमानीचा डॉक्टरांना मनःस्ताप...कसा ते वाचा?

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरापासून काही अंतरावर विष्णुपुरी येथे जिल्ह्यातील सर्वात मोठे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय आहे. रुग्णालयात काम करणारे शेकडो डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, ब्रदर्स व नर्स शहरातुन स्वतःच्या वाहनाने ये-जा करतात. सध्या ‘लॉकडाऊन’चा दुसरा टप्पा सुरु झाल्याने रुग्णालयात जा-ये करणाऱ्या डॉक्टरांना पोलीसांच्या मनमानीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ डॉक्टरांना देखील पोलीसांच्या या अडमुठे धोरणाचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. 

कोरोनाला हरविण्यासाठी पोलिसांसह आरोग्य विभागातील कर्मचारीही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. असे असतानाही आरोग्य विभागातीलच कर्मचारी तसेच डॉक्टरांना पोलिस विनाकारण त्रास देत असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांनी पोलीसांकडून आरोग्य कर्मचारी यांना होत असलेली मारहाण आणि महिला कर्मचारी यांची आडवणूक होत असेल तर, ते कर्मचारी कर्तव्यावर कसे हजर राहणार असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम झाल्यास त्याला जिम्मेदार कोण असणार? असा प्रश्‍न उपस्थित करून पोलीसांच्या मनमानी धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत

२२ मार्च २०२०च्या मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून विष्णुपुरी गावाकडे जाणारा रस्ता जागो जागी अडवण्यात आला आहे. त्यामुळे कर्तव्यावर निघालेल्या आरोग्य अधिकारी व महिला कर्मचारी यांना १५ ते २० किलोमिटरपर्यंत दुर जाऊन पुन्हा रुग्णालयात येण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. 

जिल्हाधिकारी यांच्या पासेसला केराची टोपली

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार यांची अडवणूक होऊ नये, त्यांच्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून विशेष पास दिला आहे. परंतु जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पासला चक्क पोलीस प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेला सुरक्षा पास दाखवल्यानंतरही पोलीसांकडून जास्तच मानसिक तान दिला जात असल्याचे निवेदन डॉक्टर्स, कर्मचारी यांनी पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना दिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT