file photo 
मराठवाडा

महावितरणला चुना लावणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महावितरण कंपनीचा लाखो रुपयांचा अपहार करून एक वर्षापासून फरार असलेल्या दोघांना अखेर मुखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महावितरण कंपनीचे वसुली केंद्राद्वारे केला होता अपहार. 

मुखेड शहरातील तब्बल एक वर्षांपूर्वी वीज वितरण कंपनीचा वीज भरणा जमा करणाऱ्या तिघांनी वीज बिलापोटी जमा होणारी रक्कम वीज वितरण कंपनीकडे जमा न करता त्या रक्कमेचा अपहार केला होता. या सेवाभावी संस्थेच्या विरोधात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गुन्हा दाखल होताच यातील तिन्ही आरोपी फरार झाले होते. एक वर्षाने यातील दोन आरोपींना मुखेड पोलिसांनी अटक केले आहे. यातील अजून एक आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. 

शाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मर्यादित, गडगा

शाहीर आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मर्यादित गडगा या संस्थेला मुखेड तालुक्यातील वीज भरणा बील जमा करण्याचे कंत्राट मिळाले होते. यात शहरातील व तालुक्यातील लाखो रुपयांच्या वीज बिलाची रक्कम या वीज बिल भरणा केंद्रामध्ये दररोज जमा करण्यात येत होती. मात्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय किशन भांगे, केंद्र संचालक राजू विजयराव राहेरकर यांच्यासह अनेकांनी संगणमत करून वीज बिल भरणा जमा झालेली रक्कम जमा केलेल्या ग्राहकांच्या नावे न जमा करता इतर ग्राहकांच्या नावे दाखवून बाकी सात लाख नऊ हजार ९३० रुपयांचा अपहार केल्याची बाब उघड झाली होती. 

वीज भरणा केंद्रालाच आग लावली होती

कंपनीच्या नावे रक्कम न भरता स्वतः कडे ठेवून उशिराने रक्कम भरून कंपनीच्या केलेल्या कराराचा भंग केला. ही बाब समोर येऊ नये, आपण केलेला अपहार लक्षात न यावा या उद्देशाने आरोपींनी त्या वीज भरणा केंद्रालाच आग लावली होती. मात्र या सर्व बाबींची वीज वितरण कंपनीकडून कसून चौकशी करण्यात आली. यात वरील लाखो रुपयांचा अपहार समोर आला. वीज वितरण कंपनीचे दोन कर्मचारी यात दोषी आढळल्याने त्यांना तात्काळ महावितरण कंपनीने निलंबित केले होते. 

दोघांना अटक, एकजण अजूनही फरार

या सर्व प्रकरणाची फिर्याद महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयाकडून मुखेड पोलीस ठाण्यामध्ये तीन आरोपींविरुद्ध मार्च २०१९ मध्ये देण्यात आली. व त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला. मात्र गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपीने पलायन केले. गुन्हा दाखल होऊन जवळपास एक वर्ष होत आले तरीही हे आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक अंकुशकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक भाऊसाहेब मगरे यांनी ता. २३ फेब्रुवारी रोजी फरार आरोपी संजय भांगे यास नायगाव तालुक्यातील गडगा येथून ताब्यात घेतले, तर दुसऱ्या दिवशी २४ फेब्रुवारी रोज अटक केली. त्यातील संस्थेचे सचिव अद्यापही फरार असल्याचे श्री मगरे यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT