रक्तदानासह पंतप्रधान सहायता निधीला मदत 
मराठवाडा

नांदेडला रक्तदानासह पंतप्रधान सहायता निधीला मदत

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - देशासह राज्यात करून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अर्धापूर तालुक्यातील अनेकांनी धनादेशाद्वारे मदत केली. शिवाय डॉ. विनोद जाधव यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार खासदार प्रताप पाटील चिखलीकर मदतीला उतरले आहेत. कोरोनाला परतवून लावण्यासाठी खासदार चिखलीकर व त्यांचे कुटुंबीय आपले कर्तव्य समजून गरजवंतांना मदत करत आहेत. शिवाय पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रत्येकाने केवळ शंभर रुपये देण्याचे आवाहन खासदार चिखलीकर यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. 

रक्तदान शिबिरास प्रतिसाद
अर्धापूर तालुक्यातील कामठा फाटा येथे डॉ. विनोद जाधव यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
अर्धापूर तालुक्यातील अनेक नागरिकांनी राष्ट्रीय आपत्ती असलेल्या कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीलाही भरभरून मदत केली. मदतीचे धनादेश आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या उपस्थितीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे सुपुर्द केले. 

पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत
खासदार चिखलीकर यांच्याकडे पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी डॉ. विनोद जाधव यांनी पाच हजार, गणपूर येथील गावकरी मंडळीतर्फे पाच हजार ५५५, अर्धापूर शहरातील नागरिकांच्या वतीने ११ हजार, कामठा येथील राम कदम नागोराव बिचकुले यांनी प्रत्येकी पाच हजार व कामठा येथील गावकरी मंडळींच्या वतीने दहा हजार, अर्धापूर येथील बालाजी स्वामी पाच हजार अशी एकूण ४६ हजार ५५५ रुपयांची मदत खासदार चिखलीकर यांच्या माध्यमातून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिली आहे. 

अर्धापूरला रक्तदान शिबिर
खासदार चिखलीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद ते जिल्ह्यातील असंख्य नागरिक पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी सरसावले आहेत. नागरिकांनी कोरोना लढाई जिंकण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहन खासदार चिखलीकर यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अर्धापूर तालुक्यातील नागरिकांनी भरभरून मदत दिली आहे. कामठा येथील आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी धर्मराज देशमुख, किशोर देशमुख, बाबुराव हेंद्रे, डॉ. लक्ष्मण इंगोले, बालाजी स्वामी, कृष्णा इंगोले, तुळशीराम बंडाळे, सखाराम क्षीरसागर, सुधाकर कदम, शिवराज जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ लॉजवर मैत्रिणीसह अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

SCROLL FOR NEXT