crime 
मराठवाडा

शेतात नेले फिरायला अन् ठार मारण्याचा केला प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

बोरी ः परभणी - जिंतूर रोडवरील बोरी येथील साई खानावळीसमोरील शेतामध्ये संतोष नागोराव कांबळे याने त्याच्या पत्नीस गोडीगुलाबीने शेतात नेले. तिचे इतर व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा गळादाबून व दगडाने ठेचून जीवे मारण्याचा गुरुवारी (ता.दोन) मध्यरात्री प्रयत्न केला. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (ता. दोन) मध्यरात्री घडल्यानंतर पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला.
     संतोष स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होऊन आपण पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने दिली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना पीडित महिला जिवंत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी नातेवाइकांना संपर्क साधून ताबडतोब तिला नांदेड येथे उपचारासाठी हलविले. या घटनेमुळे बोरी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेतील पती-पत्नीचा विवाह १५ मे २०१९ रोजी झाला होता. तेव्हापासून संतोष यास आपल्या पत्नीचे इतरांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. संतोष कांबळे हा गुरुवारी आपल्या सासरवाडीत पत्नीला भेटायला आला होता. रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी जाऊ म्हणून पत्नीला सोबत घेऊन परभणी रस्त्याकडे गेला असता साई खानावळीजवळ एका शेतात ते गेले. त्या ठिकाणी पत्नीला मारहाण करून डोक्यात दगड घातला व पत्नी ठार झाल्याचे समजतात स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन आपण पत्नीचा खून केला, अशी कबुली पोलिसांना त्याने दिली. या प्रकरणी बोरी पोलिस ठाण्यात मुलीचे वडील दत्तराव गवळी यांच्या फिर्यादीवरून संतोष नागोराव कांबळे (औरंगाबाद) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, जमादार व्ही. एम. गिरी हे करीत आहे. 

अल्पवयीन मुलीस पळविले;
दोन आरोपींना अटक

पूर्णा ः सारंगी (ता. पूर्णा) येथील एका पंधरावर्षीय मुलीस शुक्रवारी (ता. २७) रात्री पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चुडावा पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड करून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सारंगी येथील एका शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या शाळकरी मुलीला घराबाहेर अंगणात एकटी असल्याचे पाहून कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून तीस पळवून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.२७) घडली. तिच्या पालकांनी चुडावा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सदरील मुलीचा शोध चुडावा पोलिस घेत होते. तिच्या अपहरणाबाबत सर्व चाईल्ड हेल्प लाईनला या गुन्ह्याची माहिती देण्यात आली. पुणे रेल्वेस्थानकावरून सदरील मुलीला आरोपी शे. मोबीन शे वसीम हा सोबत नेत असताना चाईल्ड हेल्प लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तेथून वसीम फरार झाला होता. पुणे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी याची माहिती चुडावा पोलिसांना दिली. चुडावा पोलिसांनी पुणे येथून सदरील मुलीला ताब्यात घेतले व घडलेला प्रकार विचारला असता, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील शे. वसीम शे. मोबीन व पालम तालुक्यातील फरकंडा येथील विजय दत्तराव पौळ यांनी तिच्यावर अत्याचार केला, असे तिने सांगितले. यावरून सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. देवकते, नामदेव सुजलोड, रमाकांत तोटेवाड, भारत सावंत यांनी दोन्ही आरोपींना (ता. ३०) लोहा व फरकंडा येथून ताब्यात घेत गजाआड केले. त्या दोघांविरुद्ध चुडावा पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा वाढविण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले करीत आहेत. 

युवतीची फसवणूक करून अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा
पूर्णा ः मोबाईलमध्ये काढलेले फोटो भावी नवऱ्याला दाखवतो, असे म्हणत ब्लॅकमेल करत १८ वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पूर्णा शहरातील भीनगर येथील आरोपीविरोधात गुरुवारी (ता. दोन) रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे.
मिलिंद दिगांबर गवळी याने पीडित मुलीवर मे ते ऑक्टोबर २०१९ या दरम्यान नांदेड आणि पूर्णा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. पीडित युवतीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तोंडओळखीचा फायदा घेत लाडीगोडी लावून जबरदस्ती अत्याचार करण्यात आला. आरोपीने या दरम्यान पीडित मुलीचे फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर सदर मुलीचे लग्न ठरल्याने साखरपुडा झाला. ही बाब माहीत झाल्यावर आरोपीने मुलीला तुझे फोटो भावी नवऱ्याच्या मोबाइलवर टाकतो, असे म्हणत ब्लॅकमेलिंग करून ऑक्टोबर २०१९ मध्ये जबरदस्तीने अत्याचार केला. यानंतर आरोपीने फोटो पीडितेच्या भावी नवऱ्याला टाकून सोयरिक मोडली. भेदरलेल्या मुलीने बदनामी होईल म्हणून कुणाला घडला प्रकार सांगितला नाही. अखेर आई-वडिलांना सगळी हकीकत सांगून मुलीने पूर्णा पोलिस ठाण्यात सदर आरोपीविरोधात तक्रार दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार करीत आहेत.

शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग
जिंतूर ः तालुक्यातील निलज शिवारामध्ये शेतात काम करीत असलेल्या एका पस्तीसवर्षीय विवाहित महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (ता.दोन) दुपारी एकच्या सुमारास घडली. या बाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून बळिराम आडे या आरोपीविरुद्ध जिंतूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशनगर सावळीतांडा येथे राहणारी पस्तीसवर्षीय विवाहिता स्वतःच्या निलज शिवारातील शेतामध्ये पतीसोबत काम करण्यासाठी गेली होती. पती शेतातील इतर भागात काम करीत असताना महिलेला एकटी पाहून बळिराम आडे हा त्या ठिकाणी गेला व वाईट उद्देशाने तिचा हात धरून विनयभंग केला. महिलेने आरडाओरड करताच तिचा पती त्या ठिकाणी धावत आल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले. तपास सहायक पोलिस निरीक्षक शेख अहमद हे करीत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidri Sugar Factory : शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश ,‘बिद्री’ साखर कारखान्याचा उस दराबाबत 'यु टर्न' ३ हजार ६१४ पहिली उचल एकरकमी देणार

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

SCROLL FOR NEXT