मराठवाडा

औराद शहाजानी बनली अवैध धंद्यांचे केंद्र

सकाळ वृत्तसेवा

औराद शहाजानीः हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेले आहे. त्यामुळे ते आंतरराज्य अवैध धंद्याचे केंद्र बनले आहे. येथील पोलिस ठाण्याअंतर्गत ३५ गावांचा समावेश होतो. यापैकी औराद शहाजानी, बोरसुरी व तांबाळा या गावांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. ज्यामध्ये अवैध दारू, गुटखाविक्री, लॉटरी, मटका, गुडगुडी व अवैध वाहतुकीचा समावेश आहे. विशेषतः औसा मतदरसंघातील तांबाळा हे गाव अवैध धंद्याची राडधानी म्हणून ओळखले जाते.

हा अवैद धंदा बंद करण्यासाठी स्थनिक पातळीवर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या सहकार्याची गरज आहे. औरादसह परिसरात मोठ्या प्रमाणा राजरोसपणे मटका चालू आहे. केवळ औराद शहरातच जवळपास पन्नास ते साठ बुकी आहेत व तेवढेच पंटर काम करतात. त्यांची रोजची उलाढाल लाखोंच्या घरात असून गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, शेळगी रस्ता अशा मुख्या बाजारपेठेत व शाळांच्या परिसरातच उघडपणे अनेक बुकी चालतात. परंतु यावर कुठलीही कारवाई होत नाही.

त्याचबरोबर औराद शहाजानी व तांबाळा गावांमध्ये ‘गुडगुडी’ नावाचा एक जुगाराचा प्रकार उघडपणे चालू आहे. या गुडगुडी जुगाराची अनेक दुकाने या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी थाटली गेली असून, अल्पवयीन मुलांपासून तरुणही याला बळी पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ही मुले शाळा-महाविद्यालय सोडून हा जुगार खेळत आहेत. त्यांचीसुध्दा लाखोंची उलाढाल होत आहे.

तसेच औराद व परिसरात अवैध दारुविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. औराद येथे अधिकृत देशी दारुचे विक्रेते दोनच असून त्यांच्याकडून दारू घेऊन गावात व परिसरात ती अवैधरीत्या विक्री करणाऱ्या शेकडो छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी दुकाने प्रत्येक गावात व परिसरात थाटलीआहेत. 

औराद पोलिस ठाण्याअंतर्गत ही सगळा अवैध व्यवहार बंद करण्याचे आणि पुन्हा एकदा पोलिसांचा वचक निर्माण करण्याचे आव्हान औरादचे नवीन सहायक पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्यासमोर आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

३० नंतर टीम इंडियात एंट्री; ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा कर्णधार... सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजय प्रवासाची प्रेरणादायी यशोगाथा

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतत होते; मात्र वाटेतच काळानं गाठलं, लग्नाआधीच लेकीचं पितृछत्र हरपलं

Akola News : ‘चिटफंड’चा वाद पेटला, प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत; ‘बीसी’चे पैसे न मिळाल्याने ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT