संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

जिल्हा रुग्णालयात मद्यपी कर्मचाऱ्यांनी उकळले रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे

योगेश पायघन

औरंगाबाद- चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) ड्युटीवरील चार मद्यपी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. 12) रात्री गोंधळ घातला. रुग्ण, नातेवाइकांना धमकावून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नातेवाइकांच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी त्या चार गोंधळी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (ता. 13) निलंबित केले. मात्र, त्या कर्मचाऱ्यांची नावे सांगण्यास प्रशासनाने नकार दिला.

गुरुवारी दुपारच्या शिफ्टचे काही कर्मचारी आणि रात्रीच्या शिफ्टचे कर्मचारी ड्युटीवर असताना मद्यपान केले. त्यानंतर रुग्णालयात धिंगाणा घालत रुग्ण, नातेवाइकांना धमकावत पैसे उकळले. मद्यपींना घाबरलेल्या नातेवाईक व रुग्णांनी काही काळ वॉर्डही बंद करून घेतला होता. हे चारही कर्मचारी ड्युटीवरील सुरक्षा रक्षकांनाही जुमानत नव्हते. अखेर नातेवाइकांनी हिंमत करत या कर्मचाऱ्यांना एका कक्षात कोंडले. रात्रभर रुग्णालयातील परिचारिका, डॉक्‍टर, नातेवाईक या प्रकारामुळे दहशतीत होते. सकाळी नातेवाइकांनी हा प्रकार डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्या कानावर घालत लेखी तक्रार दिली. त्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी त्या गोंधळी चारही कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. हा प्रकार रुग्णालयाबाहेर न जाऊ देण्याचा प्रयत्नही रुग्णालय प्रशासनाने केला. मात्र, हा धक्‍कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेसह प्रशासनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने रुग्णालयात पोलिस चौकीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मिनी घाटीत गुरुवारी घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा होता. त्या चारही कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच सुरक्षारक्षकांनाही आवश्‍यक त्या सूचना दिल्या असून, रुग्णालयाच्या प्रतिमेला तडा जाईल असे कृत्य करणाऱ्या, कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. 
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT